दत्तवाडी शाळेचे शिष्यवृत्ती व विविध गुणदर्शन स्पर्धेत उत्तुंग यश

0

शिष्यवृत्ती परीक्षेत ४ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तर विविध गुणदर्शन स्पर्धेत तालुकास्तरीय ९ बक्षिसे प्राप्त 

जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी या शाळेतील ज्ञानेश्वरी सचिन शिंदे २६०गुण, प्रेरणा भांडवलकर २५४ गुण, स्वामिनी कुमटकर २४६गुण व विराज  धुमाळ २३६ गुण या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित दि.३१जुलै २०२२ रोजी संपन्न झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत समावेश झाला आहे. जिल्हा परिषद अ. नगर अंतर्गत पंचायत समिती जामखेड  आयोजित तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत हर्षवर्धन धुमाळ  वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत किलबिल गटात प्रथम ,आशिता  सोनवणे वक्तृत्व स्पर्धेत किलबिल गटात द्वितीय , अनुष्का शिंदे वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत किशोर गटात तृतीय , विराज जेधे हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल गटात तृतीय, शंभूराज  शिंदे वक्तृत्व स्पर्धेत बाल गटात तृतीय शिवांश  पवार वैयक्तिक गायन स्पर्धेत किलबिल गटात तृतीय अवधुत लोहार वैयक्तिक गायन स्पर्धेत किशोर गटात तृतीय, समूहगीत गायन स्पर्धेत लहान गटात द्वितीय व मोठ्या गटात तृतीय असे एकूण  तालुकास्तरीय ९ बक्षिसे प्राप्त केली असून नान्नज केंद्रांतर्गत झालेल्या स्पर्धेत विद्या  मुरूमकर वक्तृत्व स्पर्धेत किशोर गटात प्रथम ,सांस्कृतिक स्पर्धेत लहान गटात द्वितीय व मोठ्या गटात प्रथम , शुभम  फुलमाळी वेशभूषा स्पर्धेत बाल गटात द्वितीय, उत्कर्ष  ढवळे हस्ताक्षर स्पर्धेत बाल गटात द्वितीय ,ऋतुजा  शिंदे हस्ताक्षर स्पर्धेत किशोर गटात तृतीय , पूजा  फुलमाळी वैयक्तिक गायन स्पर्धेत बाल गटात तृतीय असे केंद्र व तालुकास्तरीय मिळून तब्बल १६बक्षिसे शाळेला मिळाली. 

या  विद्यार्थ्यांना मनोहर इनामदार व हरिदास पावणे या शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून सर्व गुणवंत विद्यार्थी,त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ , गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे , शिक्षण विस्तार अधिकारी .सुरेश कुंभार  व तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ व माता-पालक संघ दत्तवाडी तथा ग्रामस्थ मंडळ धोंडपारगाव यांच्यासह सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here