दादासाहेब पवार यांना महाराष्ट्र समता राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

              राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल दादासाहेब पवार यांना जनहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्र समता राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

                     परभणी येथे 9ऑगस्ट 2023रोजी क्रांती दिवसाचे औचित्य साधून जनहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्र समता गौरव पुरस्कार वितरण सोहळा हॉटेल विसावा कॅफे पार्क परभणी या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा विनोद सम्राट चित्रपट निर्माते आमचे मार्गदर्शक  विजय भाऊ पाटकर तसेच, या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताच्या माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील, प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री  गणेश रावजी दुधगावकर, प्रमुख पाहुणे अँटी करप्शन कमिटीचे नॅशनल प्रेसिडेंट रवींद्रजी दिवेदी, परभणी जिल्ह्याचे खासदार  संजय जाधव, रत्नाकर गुट्टे, गंगाखेडचे आमदार राहुल पाटील, परभणीचे आमदार विशेष सत्कार मूर्ती परभणी जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी  गावंडे, उपप्रदेशिक परिवहन अधिकारी श्रीमती स्वामी मॅडम, आदींच्या उपस्थिती पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here