दिनविशेष / राशिभविष्य

0

शके १९४५, शोभननाम संवत्सर, शुक्रवार, दि. २ जून २०२३, ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी,  चंद्र- तुला राशीत, नक्षत्र- विशाखा, सुर्योदय- सकाळी ६ वा. ०२ मि. , सुर्यास्त-   सायं. १९ वा. १२ मि. 

नमस्कार आज चंद्र तुला राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज बुध – चंद्र प्रतियोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला,धनु, मकर व कुंभ या राशींना अनुकूल तर वृषभ, वृश्चिक व मीन या राशींना प्रतिकूल आहे.

        दैनंदिन राशिभविष्य

मेष  : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील. भागीदारीत सुयश लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. कामे मार्गी लावू शकणार आहात.

वृषभ : अनावश्यक कामात वेळ वाया जाणार आहे. एखाद्या बाबतीत तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. काहींची धार्मिक प्रगती होईल.

मिथुन : चिकाटीने कार्यरत राहणार आहात. विविध लाभ होतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. जुने मित्रमैत्रिणी भेटतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरणार आहेत.

कर्क : तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. सार्वजनिक कार्यात प्रभाव राहील. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास अनुकूलता लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. नातेवाईकांच्या गाठीभेटी घेवू शकाल.

कन्या : कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक व्यवहारास दिवस अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील.

तुळ : दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

वृश्‍चिक : मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. एखाद्या बाबतीमध्ये तुमची चिडचिड होणार आहे. मनाविरुद्ध घटना घडेल.

धनु  : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. वरिष्ठांबरोबर सुसंवाद राहील. गुंतवनणुकीची व प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. अस्वस्थता संपेल. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. प्रवासाचे योग येतील. जिद्द वाढणार आहे.

मीन : आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मात्र, दैनंदिन कामे रखडणार आहेत. वादविवादात सहभाग टाळावा. प्रवासात एखादा मनस्ताप संभवतो. वाहने सावकाश चालवावीत.

आज शुक्रवार, आज सकाळी १०.३० ते १२ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४

GARGI JYOTISHAALAYA: गार्गी ज्योतिषालय, सातारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here