पोहेगांव (प्रतिनिधी) : दिवाळीची सुट्टी म्हटलं की मुलांना मामाच्या गावी जाण्याचे हौस जास्त असते. चालू वर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. विहिरी तोंड तोंड भरलेल्या आहेत. या तोंडो तोंड भरलेल्या विहिरीत मात्र मुलांना पोहण्याचा मोह आवरण आहे मात्र विशेष आहे.
काल दुपारी तीन वाजता मामाच्या गावी आलेल्या धनकवाडी ता येवला येथील कासारखेडा बंधाऱ्या जवळ असलेल्या वाल्मिक चव्हाण यांच्या विहीरीत पार्थ चव्हाण, प्रसाद जाधव, प्रेम जाधव, कृष्णा चव्हाण, ओम जाधव, धीरज गायकवाड व ईतर मुलांनी पोहण्याचा आनंद लुटला.
मुलांना झाडावर चढणे, सायकल चालवणे व पोहणे अदी कला आल्या पाहिजे या दृष्टिकोनातून माजी उपसरपंच केशवराव जाधव यांनी सुट्टी मध्ये या चिमुकल्यांना पोहण्याची कला शिकवली. पाण्यात बुडू नये म्हणून त्यांच्या कमरेला प्लॅस्टिक ड्रम बांधून त्यांना पोहणे शिकवले. जीवनात माणसाला पोहता येणे गरजेचे आहे त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत आपण एखाद्या संकटाचा सामना करू शकतो असे केशवराव जाधव यांनी सांगितले.