सुरेगाव : महाराष्ट्रामध्ये विविध सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात परंतु दिवाळी हा सण मांगल्याचा व संस्कार जपवणूकिचा सर्वात मोठा सण समजला जातो महाराष्ट्र हा सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये वसलेला असून या सह्याद्रीच्या विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी विविध ऐतिहासिक किल्ले बनवले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पद्मदुर्ग किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याचा आनंद दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला असल्याची माहिती संजीवनी स्कूलच्या प्राध्यापिका दिपाली नितीन लोहार यांनी दिली आहे
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की कोपरगाव तालुक्याच्या उपनगरातील शंकरनगर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुट्टीमध्ये मामाच्या गावाला न जाता दिवाळीची सुट्टी चा आपला वेळ छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ल्यांपैकी शत्रुच्या ताब्यात असलेल्या पोर्तुगीज व इतर आक्रमणयापैकी जंजिरा किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग किल्ल्या बनवला आहे.
पुढच्या पिढीमध्ये संस्काराची बीजं रोवत असतात. आज तंत्रज्ञान प्रगत झालं, तसं घरातील प्रत्येकाच्या हाती भ्रमणध्वनी आले. हल्ली एक वर्षाच्या तान्हुल्या बाळालाही लाडीगोडी लावण्यासाठी मोबाईल देण्याची प्रथा आयांनी रूढ केली आहे, मात्र दिपाली लोहार भ्रमणध्वनी सोडून मैदानी खेळाबरोबरच किल्ले बनविण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे. शाळेतील पाटी पुस्तक सोडुन धिंगामस्ती, मौजमजा, नव नविन कपडे, फटाके, गाण्याच्या भेंडया, मैदानी खेळ, लाडु करंज्या, गोडधोड आदिंवर बच्चे कंपनी ताव मारत असते. छत्रपती शिवाजीराजे यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्य निर्माण करत एक आदर्श राजा म्हणून कारकिर्द केली. त्या संस्काराची पाळेमुळे बीजे आपल्या पुढच्या पिढीमध्ये उतरली पाहिजे हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.
समाजमाध्यमं भ्रमणध्वनीच्या विश्वात अलिकडे मुला मुलींचा, तरूणपिढीचा इतिहासाकडे बघण्याचा कल कमी कमी होवु लागला आहे, त्यामुळे इतिहासातील ही पात्रे विसरली जाऊ नये म्हणून त्यांचे प्रत्येक माता-पिता या संस्काराची शिकवण देत असतात, असच काही दिपाली लोहार यांनी परिसरातील आपल्या विद्यार्थ्यांना किल्ला बनवुन त्या काळात घेवुन जाण्याचा प्रयत्न केला. मुलींनी किल्ल्याच्या खेळाला पहिला दिवा देवासाठी, ज्याच्यामुळे मंदिर आणि मंदिरात देव असल्याचा भास होतो, असे बोधवाक्य देवुन अत्यंत छोटया वयात आपल्या बुद्धीची चुणूक दाखवुन दिली.यामध्ये विद्यार्थी सिद्धी नितीन लोहार, शौर्य नितीन लोहार, अर्जुन सिद्धेश कपिले ,वेदिका संदीप उगले, आर्य सचिन उदावंत ,विराज भगवान अहिरे, गौरेज राजेश बुधवंत ,रुद्र अमोल लवंगारे श्रावणी बाळासाहेब डगळे, साहिल पंकज विसपुते ,आदित्य चंद्रशेखर लोहार, विधी गोपीनाथ विसपुते ,साई संतोष वाघ,अंश सचिन बागुल,अक्षदा सचिन उदावंत ,समर्थ गोपीनाथ विसपुते, साईराज बाळासाहेब डगळे, वेदांत संदीप डगळे, वेदिका मच्छिंद्र गरड ,शिवराज अनिल पवार,प्रणव चंद्रशेखर लोहार इत्यादी मुलांनी अथक परिश्रम घेतले असून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे