दिव्यांग मतदार व आधार कार्ड नोंदणी अभियान जिल्हाभर राबवावे – वसंत शिंदे

0

दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नगर – दिव्यांग मतदार व आधार कार्ड नोंदणी अभियान जिल्हाभर राबविण्यात यावे, दिव्यांगांसाठी विशेष शिबीराचे आयोजन करावे, या मागणीचे निवेदन दिव्यांग विकास आघाडीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे, उपाध्यक्ष महेश विभुते आदि उपस्थित होते.

     निवेदनात म्हटले आहे की,  जिह्यातील अनेक दिव्यांग बंधू व भगिनी जाचक अटी असल्यामुळे शासकीय सवलतीपासून आजही वंचित आहेत. परंतु कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार नोंदणी महत्वाची आहे. परंतु जिल्ह्यात बरेच दिव्यांगांची आधार नोंदणी झालेली नाही. त्यांना आधार कार्ड काढतांना जसे हाताचे ठसे न उमठने, डोळ्याच्या बाहुल्या व्यवस्थित नसणे,  फेस रिडींग न होणे, अशा अडचणी येतात.

    

आधार कार्ड काढण्यासाठी दिव्यांग व्यक्ती सेतू कार्यालयापर्यंत गेल्यावर प्राधान्याने त्यांच्याकडे लक्ष न देता त्याला अपमानास्पद वागणूक देणे या सर्व प्रोसेसला कंटाळून आमचा दिव्यांग शासकीय सवलती घेण्यापासून वंचित राहत आहे. अशा बर्‍याच योजना घेण्यापासून जिल्ह्यातील दिव्यांग असणारा लाभार्थी कोसो दूर आहे. आज जिल्ह्यात दीड लाख दिव्यांगांची संख्या असूनही फक्त एकोणीस हजार दिव्यांगाची मतदार नोंदणी झालेली आहे. ही एक खेदाची बाब म्हणावी लागेल. आजही समाजात खरे दिव्यांग योजनेपासून दुर्लक्षित राहून ज्यांच्याकडे खोटे प्रमाणपत्र आहेत. असे लोक दिव्यांगांच्या टाळूवरील लोणी खाण्यात माहीर झाले आहेत. तेच आज समाजत रुबाबात फिरत आहेत.

    

यासाठी प्रसाशनास आमची विनंती आहे. येत्या काही दिवसात तालुकानिहास दिव्यंगाच्या मतदार व आधार कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात यावे. जेणे करून जास्तीत जास्त दिव्यांग समाजाच्या प्रवाहात येतील. तरी आमच्या निवेदनाचा सहानभूतीपूर्वक विचार व्हावा, असे निवेदनात म्हटले आहे.

     यावेळी वसंत शिंदे म्हणाले, आज दिव्यांगच्या आधार व मतदार अडचणी संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  ज्या दिव्यांग बंधू-भगिनींना मतदार व आधार नोंदणीसाठी काही अडचण येत असल्यास दिव्यांग विकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

     यासाठी  दिव्यांग विकास आघाडी पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष वसंत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष ईश्‍वर गुंड, जिल्हा सचिव संतोष शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत काळे, नगर तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे,महिला जिल्हा अध्यक्षा आशाताई गायकवाड, महिला उपाध्यक्षा, काळे ताई,महेश विभुते, कैलास शेलार यासाठी आदि प्रयत्नशिल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here