दुचाकीला जोराची धडक देत बिबट्याचा हल्ला ; दुचाकीस्वार गंभीर जखमी

0

         देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  :      

                देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचारीअरुण तान्हाजी कदम राञी 8;30 घरी जात असताना घरा पासुन काही अंतरावर दोन बिबटे पळत असताना दुसऱ्या बिबट्याने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक देवून हल्ला केला.याहल्ल्यात दोन ते तीन ठिकाणी नख्या ओरखडल्या असुन डावा हात मोडला आहे.शेजारील वस्तीवरील नागरीकांनी तातडीने दवाखान्यात दाखल केले.या भागात पिंजरा लावण्याची अनेक दिवसा पासुन मागणी केली जात असतानाही वनविभागाने माञ दुर्लक्ष करीत आहे.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथिल कदम वस्ती भागात राहणारे व देवळाली प्रवरा नगर पालिकेचे कर्मचारी अरुण तान्हाजी कदम हे राञी 8;30 च्या दरम्यान घरी जात असताना किशोर निर्मळ यांच्या वस्ती जवळ घरा पासुन अवघ्या पाचशे फुटावर असताना उसाच्या शेतातून दोन बिबटे एका मागे एक पळत आले.पहिला बिबट्या मोटारसायकलला आडवा गेला तर दुसऱ्या बिबट्याने मोटारसायकलस्वारास जोराची धडक दिल्याने अरुण कदम हे खाली पडले.ते खाली पडल्या नंतर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला त्यात बिबट्याच्या नख्याचा मार लागला आहे.

                शेजारील वस्तीवरील नागरीकांनी कदम यास श्री विवेकानंद नर्सिग होममध्ये उपचारासाठी दाखल केले.बिबट्याच्या त्यांचा डावा हात मोडला आहे. तर पाठीवर व पायावर नख्याचे ओरखडे ओढले गेले.या भागात अनेक दिवसा पासुन बिबट्याचा संचार असुन एक दोन नव्हे तब्बल सात ते आठ बिबटे या भागात असल्याचे येथिल शेतकऱ्यांनी सांगितले.

                बिबट्याचा मुक्त संचारामुळे या भागातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.परंतू वनविभागाने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले असल्याने बिबटे आता मानवावर हल्ले करु लागले आहे.अरुण कदम यांच्यावर हल्ला झाल्या नंतर वन विभागास माहिती देवूनही वन विभागातील कर्मचाऱ्यांची उदानसीता दिसुन आली आहे.एकही कर्मचारी अथवा अधिकारी चौकशीसाठी फिरकला नाही.यामुळे येथिल शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here