दुध उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान बँक खात्यात वर्ग
कोपरगाव प्रतिनिधी : दूध उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला असून चारा खाद्य व मजुरी यामुळे दुध उत्पादकांना आर्थिक पोटात सहन करावा लागतो. सरकारने दुधाला अनुदान दिले आहे. या दूध उत्पादकाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने यापुढे देखील अनुदान सुरू ठेवले पाहिजे असे चांदेकसारे द्वारका डेअरीचे व्यवस्थापक किरण होन यांनी सांगितले. सोनेवाडी परिसरातील दूध उत्पादकांना दिलासा मिळावा म्हणून ऋषी अमृत दूध सेंटर तर्फे सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व कागदपत्रांची पूर्तता करत सरकारने दिलेले अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून ऋषी अमृत दूध सेंटरचे संस्थापक सागर जावळे यांनी विश्वास संपादन केला आहे असे प्रतिपादन किरण होन यांनी केले.
ते काल सोनेवाडी येथे कृषी अमृत दूध संस्थेच्या दूध उत्पादकांच्या वतीने अनुदान प्राप्त झाल्याबद्दल सागर जावळे यांचा सन्मान करताना बोलत होते.यावेळी उपसरपंच संजय गुडघे, गौतम बँकेचे उपाध्यक्ष बापूराव जावळे,बबन गव्हाणे ,लक्ष्मीकांत गुडघे, प्रा. विकास माळी, रावसाहेब जावळे,कल्याण जावळे,,उबाठा शिवसेना उपतालुकाप्रमुख कर्णा जावळे, बबलु जावळे, चिलु जावळे, दिगंबर जावळे, प्रभाकर जावळे, बि डी जावळे, शांताराम जावळे,
अनिल जावळे, अनिल जावळे, आबासाहेब मिंड, योगेश जावळे, दत्तू कांदळकर, खंडू शिंदे, प्रवीण शिंदे,संतु दहे, सोमनाथ दहे, बाळासाहेब जावळे,परशराम जावळे, योगेश जावळे, यश जावळे, आबा जावळे अदी उपस्थित होते.दूध सेंटरला चौथे वर्ष पूर्ण झाले असून स्वच्छ व पारदर्शक कारभाराच्या जोरावर या संस्थेने प्रगती केली आहे. दूध उत्पादनांना ३.५ ८.५ साठी मिळणारा 28 रुपयाचा रेट २९ रू केला असल्याचे सागर जावळे यांनी स्पष्ट केले. सरकारचे सात रुपये अनुदान शेतकऱ्यांना यापुढे मिळणार आहे . म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात 36 रुपये तरी पडतील असे त्यांनी सांगितले.सुत्रसंचालन लक्ष्मण जावळे यांनी केले.