देर्डे कोऱ्हाळेत बिबट्याचा धुमाकूळ .. 11 शेळ्या बोकडाचा पाडला फडशा …  

0

वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा ग्रामस्थांची मागणी

पोहेगांव(वार्ताहर) कोपरगाव तालुक्यामध्ये सध्या बिबट्यांची दहशत वाढत चालली असून वन विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे. काल तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे बिबट्याने एका कुटुंबाच्या सात शेळ्या जखमी केल्या तर तीन शेळ्या उचलून नेऊन त्या फस्त केल्या तर दुसऱ्या कुटुंबाची एक शेळी मारली व एक शेळी घेऊन बिबट्या रुबाबात तेथून निघून गेला. बिबट्याच्या दहशतीने परिसर पूर्ण हादरला असून बिबट्यांची संख्या एक नसून एका पेक्षा जास्त असल्याने वन विभागाने तात्काळ या बिबट्यांना जेर बंद करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावा अशी मागणी देर्डे कोऱ्हाळे ग्रामस्थांनी केली आहे. . याबाबत घडलेली माहिती अशी की सोमवारी रात्री दीड ते चार सुभाष सावंत यांच्या मालकीचे ८बोकड जागेवर फस्त केले तसेच ३बोकड बिबट्या घेऊन पसार झाला अंदाजे ४०ते ५० हजार किंमत आहे सोमनाथ आहिरे यांच्या २शेळ्या फस्त केल्या शेळ्यांची किंमत अंदाजे  २०हजार चे नुकसान झाले आहे. गणेश काळे यांच्याही दोन शेळ्या फस्त केल्या अंदाजे १५ते २० हजार किंमत असावी असा अंदाज आहे.

कचेश्वर पांडुरंग सावंत यांच्याऩंतर  दुसऱ्या वस्तीवर गणेश काळे यांच्या शेळ्यावरही बिबट्याने हल्ला करत एक शेळी जखमी केली तर दुसरी शेळी आपल्या सोबत घेऊन जात तिला फस्त केले.यासंदर्भात गावात माहिती कलाल्यानंतर सरपंच नंदाताई दळवी, उपसरपंच आशाताई दुबे, कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरूणराव येवले, माजी सरपंच योगीराज देशमुख,अजित डुबे ,त्रिंबक शिंदे ,साहेबराव शिंदे ,कृष्णा शिलेदार,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दामोदर डुबे, देवराम गवळी ,सुरेश शिरेदार, निलेश डुबे यांनी या संदर्भात माहिती घेत या बिबट्याचा बंदोबस्त होणे गरजेचे असल्याचे सांगितले. अजित डुबे यांनी आपल्या भ्रमणध्वनीवरुन घटनेची माहीती वनाधिकारी एस एस गोसावी तसेच पोहेगाव चे पशुधिकारी डाॕ आशुतोष  राहाणे यांना दिली. घटनेची माहीती मिळाल्यानंतर लगेच घटनास्थळी  गोसावी व राहाणे यांनी पंचनामा केला.यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी ग्रामस्थांनी संपर्क करत

या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ताबडतोब पिंजरा लावा अशी मागणी केली आहे. मात्र बिबट्याच्या दहशतीने पोहेगाव परिसर पूर्ण हादरला आहे.धामोरी येथील वृद्धावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता बिबट्याने देर्डे कोऱ्हाळे येथे दहशत करून तब्बल 11 शेळ्यांसह बोकडांचा एकाच रात्री फडशा पाडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here