देर्डे फाटा ते कोळपेवाडी रस्त्याची तातडीने मजबुतीकरण व रुंदीकरण करा … कुऱ्हाडे 

0

कोपरगाव (प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून यामध्ये  दर्डे फाटा ते भरवस या महामार्गादरम्यान देर्डे फाटा  कोळपेवाडी ते चासनळी पर्यंत या रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे. या रस्त्याचे तातडीने मजबुतीकरण व रुंदीकरण होणे गरजेचे आहे. या रस्त्यासाठी निधी देखील मंजूर झालेला आहे तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन या रस्त्याचे तातडीने काम सुरू करावे अशी मागणी मढी बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सदस्य सर्जेराव कुऱ्हाडे यांनी केली आहे. 

या रस्त्याच्या कामासंदर्भात त्यांनी रस्ते विभाग , अहिल्यानगर राज्य मार्ग क्रमांक सातच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन पाठवले आहे. निवेदक त्यांनी म्हटले आहेस की माजी मंत्री छगन भुजबळ यांनी 2014 साली सावळीविर ते भरवस या रस्त्याच्या कामास मंजुरी दिली होती. परंतु अद्याप पर्यंत वरील रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. सदर रस्ता हा सिन्नर शिर्डी देर्डे कोऱ्हाळे पर्यंत झालेला आहे.

परंतु सदर रस्ता हा देर्डे फाटा ते लासलगाव रोड रुंदीकरण झालेला नाही. सदर रस्त्याने गुजरात सापुतारा मार्गे शिर्डीला भाविकांचे अत्यंत वर्दळ असते. तसेच कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व महाविद्यालयात परिसरातील शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना या रस्त्याच्या अरुंदीकरणामुळे मोठी अडचण निर्माण होते. कारखाना परिसरात देखील या रस्त्याचे रुंदीकरण झाले नसल्याने अनेक वेळा कारखान्याच्या गळीत हंगामात मोठे अपघात झाले आहे. कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी ट्रक ट्रॅक्टर मुळे या रस्त्याने गर्दी असते. तेव्हा वहाण धारकांना आपली वाहने चालविताना मोठी अडचण निर्माण होते. केव्हा या रस्त्याचे तातडीने काम सुरू व्हावे अशी मागणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे , माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनाही या संदर्भात त्यांनी माहितीसाठी निवेदन पाठवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here