अहमदनगर – नगर तालुक्यातील देवगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी Rani Shinde सौ.राणी रमेश शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार दि. 30 ऑक्टरोबर रोजी देवगाव ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. प्रवर्ग स्त्री रखीव करता सरपंचपद होते. त्यानुसार कापुरवाडी मंडल अधिकारी जीवन सुतार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम पार पडला. सभेपूर्वी स.10 ते 11.30 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आले. सौ.राणी रमेश शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर देवगाव येथे नूतन सरपंच सौ.शिंदे यांच्यासह उपसरपंच आशा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य हरिदास खळे, कविता वामन यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संभाजी वामन, अर्जुनराव शिंदे, विश्वासराव खिलारी, रावसाहेब वामन, अमोल शिंदे, कुंडलिक वामन, वैभव पातकळ, बबन टांगळ, जालिंदर वामन, पंढरीनाथ वामन, दिपक टेलर, रमेश शिंदे, अंकुश वामन, मच्छिंद्र शिंदे, प्रतिक शिंदे, मच्छिंद्र जाधव आदि उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना सरपंच सौ.शिंदे म्हणाल्या, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास शिंदे यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळू. देवगांवचे नाव तालुक्यात विकास कामांनी ओळखला जाईल, असे काम आपण सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करु, असे सांगितले.
यावेळी उपसरपंच आशा शिंदे म्हणाल्या, नूतन सरपंच सौ.राणी शिंदे या सुशिक्षित तरुण, कार्यकर्त्या आहेत. गावाच्या विकासात त्यांच्या कर्तुत्वाने योगदान देतील. गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वत्र एकत्रित प्रयत्न करु, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी अशोक शिंदे, मारुतराव शिंदे, नाथा शिंदे, कमल शिंदे, ज्ञानदेव शिंदे, दिपक शिंदे, विजय शिंदे, राजू वामन, बन्सी शिंदे, दत्तू शिंदे, गोरख खळे, सरस्वती शिंदे, भामाबाई शिंदे, पप्पू शिंदे आदिंसह ग्रामपंचायत व सोसायटीचे आजी-माजी सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.