देवळाली प्रवरात बैल पोळा उत्साहात साजरा ..

0

बैलांच्या संख्येत घट, शेतकरीराजा महागाईचा चटका बसला

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :

              शहरात शेतकरी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. शेतकरीराजा सर्जा-राजाला सजविण्यासाठी सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली.परंतू महागाईने कळस गाठला होता. यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाच्या आगमनाने बैलपोळ्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता. बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्यात १० ते १५ टक्के वाढ झाल्याने यंदाच्या पोळ्याला महागाईचा चटका बसला आहे. देवळाली प्रवरात सायंकाळी बैलांबरोबर ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात आली. शहराच्या वतीने देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे व धनश्री नवाळे यांच्या हस्ते बैलांचे पुजन करण्यात आले.शहरात विविध ठिकाणी बैलपुजन करण्यात आले.

                बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी देवळाली प्रवरा बाजारातळावरील दुकानात शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.परंतू साजशृंगार वस्तूच्या किमंतीमध्ये मोठी वाढ झाल्याने. शेतकऱ्यांनी जेमतेम खरेदी करुन बैल पोळा साजरा केला आहे.

               बैलांच्या सजावटीसाठी शेतकरीसुद्धा दरवर्षी मोठया प्रमाणात साज शृंगाराच्या साहित्याची खरेदी करतो.बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तू कासरा, सर, पैंजण, झूल, बैलांच्या शिंगांना लावायचा हिंगूळ,गाय दोरा, फुगे रंगबेरंगी गोडे, पंट्या गळ्यातील घुंगराच्या माळा आदी वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्या होत्या. परंतू महागाई मुळे जेमतेम वस्तू खरेदी विकत घेवून सर्जा-राजाला सजविण्यात येवून शेतकरीराजाने पोळा सण साजरा केला.

               यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा आनंदी असून आपल्या लाडक्या आणि सर्जा-राजाचा सण साजरा करताना महागाईचा विचार न करता कर्जबाजारी होवून पोळा सण साजरा केला.सायंकाळी शेतकरीराजाने सजवलेले सर्जा-राजा गावातील हनुमान मंदिरासमोर आणून गावात मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकीत डिजे, ढोलताशा, बँडपथक आदी सहभागी झाले होते.शहराच्या वतीने देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे व धनश्री नवाळे यांच्या हस्ते बैल पुजन करुन पुरपोळीचा नैवद्य दाखविण्यात आला. 

             शेती व्यवसायात दिवसेंदिवस मनुष्यबळाचा वापर अत्यल्प होत आहे. बैलांचे संगोपन करणे सोपे राहिले नाही.चारा, पशुखाद्य वैरणाचे भाव गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे बैलाकडून शेती करून घेणे अशक्यप्राय होत.चालले आहे. काही वर्षांपूर्वी शेतकरीराजाकडे दहा बारा बैलांची जोडी असायच्या आता माञ एक बैलदेखील पाहावयास मिळत नाही. यावर्षी वरुणराजाने कृपा केली असली तरी महागाईने शेतकरीराजाला चटका दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here