देवळाली प्रवरा नगरपरिषदे शहरातील कचरा कमी करण्यासाठी आरआरआर सेंटर उभारले   

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :

                      देवळाली प्रवरा नगर पालिकेने कचरा कमी करणे, त्याचा पुनर्वापर व त्यावर प्रक्रिया करून नव्याने उपयोगात आणणे याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रेड्युस ,रियूज, रिसायकल (आरआरआर) सेंटर उभारण्यात आले आहे.

             देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. त्रिंबकराज सार्वजनिक वाचनालय येथे रेड्युस ,रियूज, रिसायकल सेंटरचे उद्घाटन शहरातील जेष्ठ नागरिक लक्ष्मण मोरे यांचा हस्ते करण्यात आले.देवळाली प्रवरा नगरपरिषदे चे आरोग्य विभागाचे  अभियंता अमोल दातीर,ग्रंथपाल संभाजी वाळके,राजेंद्र हरगुडे,गोरख भांगरे, शहर समन्वयक उदय इंगळे, दत्ताञय होले,अक्षय भालेकर, विश्वनाथ भांगरे, महंम्मद शेख,दानिश पठाण आदीसह नगरपरिषद कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

                 यावेळी शहर स्वच्छता समन्वयक उदय इंगळे यांनी रेड्युस ,रियूज, रिसायकल (आरआरआर) या सेंटर बाबत माहिती देताना सांगितले की,शहरातील कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर व त्यावर प्रक्रिया करून नव्याने उपयोगात आणणे याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यभरातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपरिषद  ‘माझे स्वच्छ शहर’ अभियान राबवणार आहे. पाच जूनपर्यंत चालणाऱ्या या तीन आठवड्यांच्या या अभियानात शहरातील नागरिकांनी  वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, बूट, बॅग, फर्निचर, भांडी व अन्य साहित्याचे इतरञ फेकुन देण्याऐवजी या सर्व वस्तूंचे श्री.ञिंबकराज वाचनालय येथे संकलन सेंटर उभारण्यात आले आहे.नागरिकांनी इतरञ वस्तू फेकुन देण्याऐवजी संकलन केंद्र येथे जमा कराव्यात. या संकलीत होणाऱ्या वस्तू अथवा कचऱ्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया करून पुनर्वापर करण्यात येईल. शहरातील स्वयंसेवी संस्था, बचतगटांच्या महिला सदस्य व नागरिक गटांना या अभियानात सहभागी होता येईल.असे इंगळे यांनी सांगितले.                         

               मुखाधिकारी अजित निकत यावेळी नागरिकांना जाहिर आवाहन करुन  जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, बूट, बॅग, फर्निचर, भांडी व अन्य साहित्य रेड्युस,रियूज,रिसायकल (आरआरआर) सेंटर मध्ये जमा कराव्यात यामुळे शहरातील कचरा कमी करण्यास हातभार लागेल असे निकत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुञसंचालन ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी तर आभार प्रदर्शन आस्थापना विभाग प्रमुख गोरख भांगरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here