देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
देवळाली प्रवरा नगरपालीकेने स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत सोशल लॅब एन्व्हायरमेंटल सोल्यूशन प्रा. लि. यांच्या वतीने शहरातील नागरिकांना व बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये प्लास्टिक बंदी विषयी जनजागृती करण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांंनी बनविलेल्या कागदी पिशव्या वापट करुन प्लास्टिक पिशवी वापरण्यास स्वतः पासुन बंदी घातली तरच प्लास्टीक पिशवीचा वापर थांबू शकतो.हि जनजागृती सोशल लॅब एन्व्हायरमेंटल सोल्यूशन प्रा. लि. या संस्थेने केले आहे.
दुकानदारासह ग्राहकांना कागदी पिशव्या किंवा कापडी पिशव्या यांचा वापर याविषयी माहिती देण्यात आली. देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी येथिल नंदकुमार इंग्लिश मिडीयम स्कूल व डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कूल या शालेय विद्यार्थ्यांना कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षिण दिले.विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कागदी पिशव्या आठवडे बाजारातील दुकानदार, फळ विक्रेते, भाजी विक्रेते व इतर दुकानदारांना वाटप करण्यात आले. देवळाली प्रवरा नगरपरिषद च्या हद्दीमध्ये व्यापाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले आहे.
प्रशासकीय अध्यक्ष अनिल पवार,मुख्याधिकारी अजित निकत, कार्यालयीन अधिक्षक सुदर्शन जवक, नोडलं ऑफिसर अमोल दातीर, शहर समन्वयक. उदय इंगळे, सोशल लॅबचे प्रतिनिधी भारत जवादे,योगेश झिंजूर्डे, धम्मदीप शिरसाठ,ज्योती ठाकरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.