देशाच्या प्रगतीत भर घालणारा अर्थसंकल्प- बिपीनदादा कोल्हे

0

कोपरगांव :-

             पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला आत्मनिर्भर बनविण्यांसाठी ज्या ज्या योजना आणल्या त्याची जनमानसात अंमलबजावणी होत आहे. येणा-या पुढच्या पिढयांसाठी जो अर्थसंकल्प सादर केला तो देशाच्या प्रगतीत भर घालणारा असुन शेतकरी घटकांसाठी पंतप्रधान धनधान्य योजना सुरू करून आणखी एक नवे पाउल उचलले असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

             

ते पुढे म्हणांले की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करत भारत देशाच्या विकासात भर घालणा-या नवनविन योजना सुरू करून नोकरदार मध्यमवर्गीयांना आयकरात मोठा दिलासा दिला आहे. तेलबिया उत्पादन वाढविण्यांसाठी आजवर जे प्रयत्न झाले त्याच धर्तीवर डाळींमध्ये भारत देशाला स्वयंपुर्ण बनविण्यासाठी नवे धोरण आखण्यांत आले आहे. विकसीत देशात इलेक्ट्रीक उत्पादनांवर भर आहे, विकसनशील देशही यात पुढे यावे म्हणून इलेक्ट्रीक कार उत्पादन आणि उद्योगवाढीसाठी अर्थसंकल्पातुन ठोस उपाययोजना होत असल्याचे चित्र आहे.

           रस्ते, रेल्वे हे विकासाचे मार्ग असुन त्याच्या पायाभूत सुविधांवर भर देत चांगली तरतुद करण्यांत आली आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेतुन प्रत्येक राज्याच्या सहभागावर विशेष लक्ष देण्यांत आले आहे. कॅन्सर उपचारावरील औषधोपचारात मोठी सवलत देवुन रूग्णांना दिलासा दिला आहे. वाढत्या लोकसंख्येमागे सध्या डॉक्टरांचे प्रमाण कमी असुन त्यासाठी आणखी १० हजार वैद्यकीय प्रवेशाच्या जागा वाढविण्यांवर पंतप्रधान मोदींचा भर आहे.

           डिजीटल भारत या संकल्पनेत आपल्या देशाबरोबरच येथील तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणा-या विद्यार्थ्यांना पुढे घेवुन जाण्यासाठी तीन एआर सेंटरला मंजुरी देण्यांत आली हे नवे पाउल उचलत विकसीत देशाबरोबर आपल्या देशाला आणखी प्रगत केले जात आहे. स्टार्टअपसाठी आणखी १० हजार कोटींचा वित्तपुरवठा वाढविण्यांत आला आहे. 

         

 पर्यटनांतुन शाश्वत रोजगार निर्मीती व्हावी त्याचबरोबरच भारत खेळणी उद्योगात पुढे जावा म्हणून यावरही विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प भारत देशाची अर्थव्यवस्था व ग्रामिण भाग आणखी मजबुत करणारा आहे. 

            जगाने कोरोना सारखे संकट पाहिले त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाची जगात ओळख निर्माण केली, गरीबांसह उच्च वर्गातील जनतेला यात मोठा दिलासा दिला आहे. शेती, उत्पादन, विद्यार्थी, तंत्रज्ञान, रोजगार, सुक्ष्म मध्यम उद्योग, संशोधन, आरोग्य, सुधारणा, अर्थ बळकटीकरण, महिला, युवक आदि सर्वच क्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक असल्याचे बिपीनदादा कोल्हे शेवटी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here