संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक
संगमनेर : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज शुक्रवारी होत असलेल्या निवडणुकीत व्यापारी मतदारसंघातील दोन उमेदवारांनी शेतकरी विकास मंडळाच्या अधिकृत उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा दिल्या असल्याचे स्वतः उमेदवार शेख नबी पापाभाई व शेख रफिक पापाभाई यांनी जाहीर केले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याच्या विकासाची घोडदौड सातत्याने सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम हे राज्यात अव्वल दर्जाचे असून खरे तर ही संपूर्ण निवडणूक बिनविरोधच व्हायला हवी होती. मात्र काही नतदृष्ट शक्तींनी ही निवडणूक विनाकारण लादली आहे.शेतकरी विकास मंडळाचे कामकाज आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावरील सार्थ विश्वास यामुळे मी शेख नबी पापाभाई व मी शेख रफिक पापाबाई हे शेतकरी विकास मंडळाचे अधिकृत उमेदवार शेख निसार गुलाब यांना व्यापारी मतदारसंघातून जाहीर पाठिंबा देत आहोत. सर्व व्यापारी बांधवांनी व मतदार बंधू भगिनींनी शेतकरी विकास मंडळाच्या सर्व उमेदवारांना मतदान करावे असा आग्रह आम्ही करत आहोत.शेख नबी पापाभाई व शेख रफी पापाभाई यांनी दिलेल्या पाठिंबाबद्दल शेतकरी विकास मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.