नवी दिल्ली : वृत्तवाहिन्यांवर प्रत्येक गोष्ट टीआरपीसाठी सुरु असून, यासाठी वाहिन्यांमध्ये स्पर्धा आहे. संवेदनशील मुद्यांचा अजेंडा ठरवला जातो. मात्र आपल्या कार्यक्रमांमधून समाजात द्वेष पसरवला जात असेल अशा वृत्तनिवेदकांना पडद्यावरून दूर केलं पाहिजे अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने वृत्तवाहिन्यांना फटकारलं आहे.
युपीएससी जिहाद, कोरोना जिहाद, तबलगी जमात, धर्म संसद आदी द्वेषपूर्ण भाषणांचे संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. द्वेष पसरवणारी भाषणं आणि त्यावर कार्यक्रम घेण्यास, प्रसारण करण्यास वृत्तवाहिन्यांनी रोख लावावी अशी मागणी करण्यात आली. न्यायमूर्ती के.एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.