धारणगांवच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे गणेश थोरात तर खोपडीच्या उपसरपंचपदी गोविंद नवले बिनविरोध

0

कोपरगांव:- दि. ३१ डिसेंबर २०२२

            तालुक्यातील धारणगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे गणेश आप्पासाहेब थोरात तर खोपडीच्या उपसरपंचपदी गोविंद बाळासाहेब नवले यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

          धारणगांवच्या नवनिर्वाचित सरपंच वरूणा दिपक चौधरी व उपसरपंच गणेश आप्पासाहेब थोरात तसेच खोपडीचे सरपंच विठाबाई वारकर, उपसरपंच गोविंद बाळासाहेब नवले यांचा सत्कार करण्यांत आला सत्कारास उत्तर देतांना ते म्हणाले की, गांव विकासासाठी सर्वांचा एकोपा दाखवुन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या  कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनांच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करून उर्वरित विकास प्रस्तावासाठी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचे सहकार्य घेवु. कोपरगांव विधानसभा मतदार संघात २७ ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपा कोल्हे गटाचे सर्वाधिक १२२ सदस्य मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here