पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते शेखर पाटील यांचे व्याख्यान
जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथे शिवजयंती उत्सव हा केवळ इव्हेंट न बनवता ‘सद्वर्तनातून प्रत्येक शिवप्रेमीने शिवरायांना अभिवादन करणे’ ही खरी शिवजयंती असल्याचे मत पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते शेखर पाटील यांनी जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथील शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानातून व्यक्त केले.शिवचरित्रातील अनेक प्रेरणादायी प्रसंगांचे प्रभावी व परिणामकारक भाषेत वर्णन करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जिद्द, सकारात्मक दृष्टीकोन ,राजनैतिक धोरण व दूरदर्शीपणा यांवर भाष्य केले.
दि.२६फेब्रुवारी २०२३ रोजी धोंडपारगाव येथे शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थ मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली.ज्येष्ठ उद्योजक तथा धोंडपारगावचे संतोष पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती जामखेडचे माजी सभापती डाॅ.भगवानराव मुरूमकर, शरद कार्ले, व लहु पवार,सुरज पवार,गणेश सावंत,उमेश कात्रजकर, हे उपस्थित होते.यावेळी सकाळी ९ ते दु.२:३० या दरम्यान ‘रक्तदान शिबीर’ घेण्यात आले. त्यात एकूण ५० शिवप्रेमींनी रक्तदान केले.तर रात्री व्याख्यानापूर्वी इ.१ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांत वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या.इ.१ली ते ४थीच्या लहान गटात वैष्णवी दिपक शिंदे ,शुभम रामदास फुलमाळी व उत्कर्षा अनंत भांडवलकर यांचा तर इ.५वी ते १०वीच्या मोठ्या गटात अनुष्का बंडू शिंदे,अर्पिता महादेव हजारे व अमृता बळीराम शिंदे या विद्यार्थ्यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आला.पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अनुक्रमे ७५० रू, ५०० रू व २५० रू. रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आले.यावेळी अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धोंडपारगावचे युवा नेते पै.दत्ता शिंदे,बळीराम शिंदे ,हनुमंत शिंदे,दादा साळवे, अमोल धुमाळ,प्रविण शिंदे, मोईन बागवान,नामदेव धुमाळ, विशाल शिंदे,माउली शिंदे,लखन चंदनशिव,यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीतील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी गावातील शिक्षणप्रेमी नागरिक,महिला व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक रामचंद्र शिंदे यांनी केले व प्राथमिक शिक्षक म्हणून गावात प्रदीर्घ काळ सेवा करून शासनादेशानुसार बदली झाल्यामुळे नामदेव खलसे व मनोहर इनामदार या दोन्ही आदर्श शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक कार्याच्या गौरवार्थ ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक सत्कार करण्यात आला आभार पै. दत्ता शिंदे यांनी मानले