देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
तालुक्यातील पत्रकारांचे वास्तववादी लिखाण नेहमीच दिशादर्शक राहीले आहे. विविध अंगाने येथील पत्रकारांनी पत्रकारीता जोपासली व वाढवली चुकीच्या व प्लांटेड बातम्या येथील पत्रकारांनी दिल्या नाहीत. त्यामुळे राहुरी तालुक्यातील पत्रकारीता इतर भागाच्या तुलनेत वरच्या क्रमांकाची राहिली आहे. तो वसा आगामी काळात जपला जाईल ही खात्री आहे. आधुनिक पञकारीता काळात व्यासपीठावरील नेते जे बोललेच नाही,ते वाक्य आमच्या तोंडी घातले जात आहे.अशा चुकीच्या पञकारीतेमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्नी मी तुमच्याबरोबर असून त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे अहमदनगर दक्षिणचे खा. सुजय विखे पा. म्हणाले
राहुरी तालुक्यातील पत्रकारांचा मुळा धरणावर त्यांनी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते व्यासपीठावर माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्ता पा. ढुस, तानाजी धसाळ, साईनाथ कोळसे, आर. आर. तनपुरे, शिवाजी डौले, महेश पाटील, नंदकुमार डोळस आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला
खा. विखे पुढे म्हणाले चांगल्या कामाचा उल्लेख सद्यस्थितीत होत नसल्याने लोकप्रतिनिधींनी प्रतिमा समाजात चांगली जात नाही चुकलं तर निश्चितच पत्रकारांनी जागा दाखवायला हवी. मात्र चांगल्या कामाचे योग्य मुल्यमापन लावत कौतुकही व्हायला हवे सामाजिक माध्यमांमुळे म्हणा अथवा अन्य कारणामुळे समाजातील वैचेरिकता संपत चालली आहे ती संपू न देण्याची महत्त्वाची जबाबदारी ही पत्रकारांवर आली आहे पत्रकारांनी सामाजिक प्रश्न मांडायला हवेत जेणेकरून लोकप्रतिनिधींच्या ते नजरेत येतील व त्यावर लक्ष केंद्रित करता येईल बरोबरच खर बोललं तर त्याचा विपर्यास होतो माझ्या मते सत्य बोलणारा लोकप्रतिनिधी हवा परंतू पत्रकारांनीही त्याला वेगळं रूप न देता प्रतिसाद देणं अपेक्षित आहे लोकशाही आणखी मजबूत करण्यासाठी ती गरज असल्याचेही ते म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ कदम व आप्पासाहेब ढोकणे यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष गायकवाड यांनी केले.