राष्ट्रीय पुरस्काराचा नगरला प्रथमच मान मिळाल्याचे समाधान-अशोक भंडारी
अहमदनगर – टेक्निकल क्वालिटी व्हेरिफिकेशन (ढ.ट.त.) सपोर्टींग पार्टनर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (इ.ड.ए.) यांच्यावतीने देण्यात येणारा ‘इंडिया 5000 बिझनेस अॅवॉर्ड’ नगर येथील मे. धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी यांना जाहिर झाला होता. या पुरस्काराचे वितरण रिलायन्स इंडिया लिमिटेडचे आर.एन.डी. व्हाईस प्रेसिडेंट डॉ. शरद लांडे यांच्या हस्ते मे.धनलक्ष्मी ट्रेडिंगचे अशोक भंडारी व पराग भंडारी यांना नवी मुंबई येथे शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बिझनेस अॅवॉर्डचे चेअरमन केतन विकारीया आदिंसह भंडारी परिवार उपस्थित होते. देशातील विविध क्षेत्रातील व्यवसायिकांचा यामध्ये समावेश असतो. त्यातून निवडक व्यावसायिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो.
अवॉर्ड मिळाल्यानंतर अशोक भंडारी म्हणाले, धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून गेल्या 33 वर्षांपासून तांदूळ, पोहा, मुरमुरा व गहू यांचे होलसेल व्यापारी, अधिकृत डिस्ट्रीब्यूटर ऑफ हॅलो बासमती टिल्डा बासमती अॅण्ड डबल कटार बासमती व ए.के. अनारकली सेला बासमती आदिंचे ठोक व्यापारी म्हणून ग्राहकांभिमुख सेवा देत प्रत्येकाचे समाधान हेच ध्येय ठेवल्याने आमच्याशी अनेक लोक जोडले गेले आहेत. व्यवायातील बारकावे आणि ग्राहकांच्या मागण्यानुसार बेस्ट क्वॉलिटीचा माल उपलब्ध करुन देत असल्याने आमचे असंख्य ग्राहक समाधानी आहेत. राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्यावतीने आम्ही देत असलेल्या सेवेची दखल घेत मिळालेल्या पुरस्काराने आम्हास प्रोत्साहन मिळाले आहे. नगर जिल्ह्याला प्रथमच धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून पुरस्कार मिळाला असल्याचे मोठे समाधान असल्याचे अशोक भंडारी यांनी सांगितले.
सदरचा अवार्ड अहमदनगर येथे प्रथमतःच मिळाला असल्याने श्री. अशोक भंडारी व श्री. पराग भंडारी यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.