राहुरीत दरोडा टाकण्यापुर्वी दरोडेखोरांना पोलिसांनी केली अटक 

0

दोन दरोडेखोर पळाले.

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                  नगर मनमाड महामार्गावरील वांबोरी फाटा शिवारात गस्तीवरील पोलिसांना टाटा इंडिकाकारच्या बाजूला 5 इसम संशयास्पद रीतीने हालचाल करत असल्याचे दिसल्याने गस्तीवरील पथकाने त्यांना हटकवले असता 5 दरोडेखोर सैरभैर झाले. त्यापैकी दोघे नजीकच्या शेतात पळाले. राहुरी येथे दरोडा टाकण्यासाठी आलेल्या अहिल्यानगर येथिल विळद घाटातील तिघा दरोडेखोरांना राहुरी पोलिसांनी शिताफीने अटक करण्यात आली आहे. 

               

याबाबत पोलिस सुञाकडून समजलेली माहिती अशी की, दिनांक  21 डिसेंबर रोजीचे रात्री 1 वा.चे सुमारास नगर मनमाड महामार्गावरील वांबोरी फाटा शिवारात राहुरी पोलिसांचे पो. काँ. अंकुश भोसले व लक्ष्मण खेडकर यांचे पथक शासकीय वाहनाने राञीगस्त घालत असताना वांबोरी फाटा येथे टाटा इंडिकाकार च्या बाजूला 5 जण संशयास्पद रीतीने हालचाल करत असल्याचे दिसले. गस्तीवरील पथकाने त्यांना हटकवले असता 5 जणांपैकी दोघे शेजारच्या शेतात पळून गेले.तर तिघे इंडिका गाडीत बसू लागल्याने गास्तीवरील पोलिसांनी तात्काळ कार मध्ये बसणाऱ्या किशोर अर्जुन बर्डे वय 35 वर्ष ,सुनील संजय निकम वय 27 वर्ष,अंबादास एकनाथ पवार वय 50 वर्ष (सर्व राहणार पाण्याची टाकी विळदघाट ता.नगर जिल्हा अहिल्यानगर) तीघांना समय सूचकता दाखवत कार सह ताब्यात घेतले.राहुरी पोलीस स्टेशन येथे त्यांच्या कार सह घेवुन आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता 5 ही आरोपी हे दरोड्याच्या तयारीने आलो असल्याची कबूली ताब्यात तीन आरोपींनी दिली.

पोलीस हवालदार जानकीराम खेमनर यांनी आरोपींच्या ताब्यातील कार पचां समक्ष तपासणी केल्यावर दरोड्याच्या तयारीस लागणारे साहित्य मिळुन आले.राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अंकुश भोसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि नंबर 1299/2024 भारतीय न्याय संहिता कलम 310(4),310 (5),प्रमाणे गुन्हा दाखल केला. व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने  त्यांना 3 दिवस पोलीस कस्टडी सुनावली आहे.तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे व पो कॉ इफ्तेखार सय्यद करत आहे.                   

           

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक  वैभव कलुबरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोहेकॉ जानकीराम खेमनर, सुरज गायकवाड, अंकुश भोसले, संतोष राठोड, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख , गणेश लिपणे,पो कॉ इफ्तेखार सय्यद, पोकॉ अविनाश दुधाडे पोकॉ लक्ष्मण खेडकर आदींनी कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here