देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
नगर जिल्ह्यातील त्या बहुचर्चित घटनेबाबत सीबीआय चौकशी करावी व त्या दोन वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी शिफारस आणि अहवाल राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने महाराष्ट्र सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविल्याचे वृत्त हाती आले आहे .
जुलै 2023 मध्ये नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात शालेय विद्यार्थिनी बाबत घटना घडली होती. घटनेमुळे नगर जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली होती. राज्य सरकारने आणि राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या प्रमुख सदस्यांनी नगर जिल्ह्यातील पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी मुली , त्यांचे नातेवाईक , स्थानिक पोलीस अधिकारी तसेच विभागीय पोलीस अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या भेटी घेऊन चौकशी केली होती .
दोन महिन्यानंतर सदर घटनेबाबत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे प्रमुख कानूनगो प्रियांक यांनी या नगर जिल्ह्यातील घटनेबाबत सीबीआय चौकशी करून संबंधित दोघा आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस केल्याची माहिती हाती आली आहे . याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत .
या घटनेबाबत स्थानिक पोलिसांकडून कारवाई झालेली असली तरी स्थानिक पोलीस अधिकारी यांच्यावर काय कारवाई होणार का ? याचीही चर्चा सुरू आहे .