नव्या पिढीला,जुन्या पिढीने संस्कारीत गोष्टी दिल्याच पाहिजे :डाँ.संजय कळमकर

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
                  नव्या पिढीला,जुन्या पिढीने जुन्या जानत्या संस्कारीत गोष्टी दिल्याच पाहिजे.परंतू आज मात्र सर्वजण सोशल मिडीयाच्या आहारी गेले आहेत. जुनी पिढी चुका मध्ये आनंद शोधायचे, आजची पिढी मात्र आनंदा मध्ये चुका शोधतात. त्यामुळे अपेक्षा भंग होतो. त्यामुळे जगण्यात आनंदी व समाधान नाही. असे लेखक व व्याख्याते डाँ.संजय कळमकर यांनी सांगितले.
           देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या वतीने श्री.त्रिंबकराज व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प “हसण्यासाठी जगा” या विषयावर डाँ.संजय कळमकर यांनी देवळाली प्रवरा शहरातील साहित्यीक रसिकांना पोट धरुन हसविण्यास लावले.या धावपळीच्या युगात स्वतःसाठी हसले पाहिजे.जगण्यासाठी हसले पाहिजे व्याख्यानातून कानमंत्र दिला.
         

  व्याख्यानमालेचा शुभारंभ माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते कण्यात आला.यावेळी माजी सनदी अधिकारी दत्ता कडू,रेवजी सांबारे,पत्रकार रफीक शेख मुख्याधिकारी विकास नवाळे,शिवाजीराव मुसमाडे,राजेंद्र लोंढे,रामभाऊ काळे, बाळासाहेब ढुस,बाबानाना कदम,त्रिंबक डावखर आदी उपस्थित होते.
                 यावेळी कळमकर म्हाणाले की, देवळाली प्रवरा या छोट्याशा गावात व्याख्यानमालेत जगण्यासाठी हसा हाच कानमंत्र दिला. आपली संस्कृती टिकविण्या काम  जुन्या जानकर लोकांनी तरुण पिढीला दिले पाहिजे.मोबाईवा संस्कृती तरुण आनंदला मुकले आहेत.
            

सरकारला हसणे मान्य नाही.आधार कार्डावरील फोटो पाहिल्यावर कळते सरकारला नागरिकांना हसू द्यायचे नाही.आज मतदान करण्यासाठी उत्साहि नाहीत.सायंकाळी सहा नंतर ७३ लाख मतरांनी उशिरा मतदान केले.असे डाँ.कळमकर यांनी सांगीतले.
          यावेळी माजी आ.कदम यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी प्रास्ताविक केले.कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर , दिवाबत्ती वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल,वसुली विभागाचे सारंगधर टिक्कल,आरोग्य निरीक्षक कृष्णा महांकाळ, अरुण कदम,राजेंद्र कदम,अश्विनी भांगरे, अमोल पंडित,गोरख भांगरे,राजेंद्र कदम, बाळासाहेब भोंडगे , नंदू शिरसाठ,अमोल कांबळे, राजेंद्र हारगुडे, विकास गडाख, सोमनाथ सूर्यवंशी,निळकंठ लगे %  अमोल पंडित,गोरख भांगरे,राजेंद्र कदम, बाळासाहेब भोंडगे , निलकंठ लगे, स्वप्निल फड, अभिषेक सुतावणे, अमोल जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here