आरोपींला कठोर शासन करून फाशीची शिक्षा द्या अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार – पोपटराव फुले
जामखेड तालुका प्रतिनिधी – मारेगाव ता. किनवट जिल्हा नांदेड येथील मांतग समाजातील तीन मुलींवर अत्याचार करून हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ आधुनिक लहुजी सेनाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पोपटराव फुले व कार्यकर्ते यांनी दि.१० रोजी जामखेड तहसील कार्यालय व जामखेड पोलीस स्टेशन यांना निषेधार्थ चे निवेदन देऊन निषेध केला.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तीन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली असुन या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शासन करून फाशीची शिक्षा देण्यात यावी व या कुटुंबाला शासनाने त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावे व हि केस फास्टटॅग ने न्यायालयात चालवण्यात यावी व आरोपीला कडक शासन न झाल्यास आधुनिक लहुजी सेनाच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा खणखणीत इशारा आधुनिक लहुजी सेनाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पोपटराव फुले यांनी नायब तहसीलदार भोसेकर व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी निवेदन देताना मांतग समाजाचे नेते व आधुनिक लहुजी सेना जि. कार्याध्यक्ष पोपटराव फुले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मधुकर राळेभात,मा.नगरसेवक अमित जाधव, बाळासाहेब कांबळे, अशोक वाल्हेकर, आस्तिक डाडर, प्रदिप खवळे, सुभाष कांबळे, नागेश फुले, बाळासाहेब साठे, मनोज डाडर, बाळासाहेब डाडर, अरविंद डाडर, सुभाष शिंदे, संदीप खवळे, सुरज क्षीरसागर, नितीन मोरे, आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते