नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण- माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात

0

संगमनेर  : मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे.सुख,समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे हा संदेश देणारा नाताळ हा सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी त्यांनी नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या.
              माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शहरातील सुदर्शन या निवासस्थानी गाणी येशूच्या जन्माची या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते.याप्रसंगी सौ कांचनताई थोरात ,कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, टाटा मेमोरियल हॉस्पिटल कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ.हसमुख जैन उपस्थित होते तर आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या निवासस्थानी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, डॉ.सौ मैथिलीताई तांबे या उपस्थित होत्या. यावेळी आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, ॲड. अरविंद राठोड, बाळासाहेब घोडके, धर्मगुरू रेव जॉर्ज चोपडे, प्रतीक खरात, सत्यानंद कसाब,स्वप्निल कसाब, वीणा रोहम, सौ अल्फा खरात, प्रज्वल चोपडे आदीं उपस्थित होते. यावेळी या गीत समूहाने येशू जन्माची विविध गीते गायली.
           यावेळी शुभेच्छा देताना आमदार थोरात म्हणाले की, आज जगाला येशू ख्रिस्तानी दिलेल्या दया, क्षमा, शांती या संदेशाची नितांत गरज आहे. समाजातील गरीब, वंचित  यांना  मायेने ख्रिस्ताने जवळ केले. आचार, विचार याचबरोबर शत्रूलाही प्रेमाने जिंकण्याचे सामर्थ्य त्यांनी सर्वांना दिले. जागतिक पातळीवर नाताळ हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बंधूभाव जपताना प्रत्येक मनुष्यावर प्रेम करा हा मोलाचा संदेश त्यांनी सर्वांना दिला असल्याचे सांगितले.आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, माणसाने रागावर नियंत्रण मिळवत प्रेमाने जग जिंकायला हवे. हा प्रेमाचा संदेश संपूर्ण जगाला यशुंनी दिला असून आज अशांततेच्या वातावरणात हा प्रेमाचा संदेश मोलाचा ठरत आहे. संपूर्ण  भारतातही हा सण अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संगमनेरमध्ये ही नाताळ सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असल्याचे ते म्हणाले.यावेळी प्रास्ताविक श्री.चोपडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.बाबा खरात यांनी तर सत्यानंद कसाब यांनी आभार मानले. याप्रसंगी बाबा खरात यांनी विविध गीते गायली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here