सभापती राम शिंदे यांच्या डिजीटल स्कुल अंतर्गत ऑनलाईन स्वरूपात लोकार्पण; शिंदे यांनी साधला विद्यार्थीनीशी संवाद
जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील नान्नज येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नान्नज मुली शाळेत सभापती प्रा.राम शिंदे यांच्या डिजिटल स्कूल संकल्पने अंतर्गत ऑल इन वन टच पॅनलचे ऑनलाईन स्वरूपात लोकार्पण संपन्न झाले. शाळेत ऑनलाईन स्वरूपात लोकार्पण सोहळा संपन्न झाला सोहळ्यासाठी गावचे सरपंच महेंद्र मोहळकर,भाजपाचे नेते सुनील हजारे,भाजपाचे ता. सरचिटणीस उदय पवार,शा.व्य.स. मुलीचे अध्यक्ष समिर शेख ,शा.व्य.स अध्यक्ष नान्नज मुले अध्यक्ष मझर पठाण,महावीर मेहेर,मनोज हजारे ,शांतीलाल साळवे,सुनिल साठे ,युवराज हजारे,केंद्रप्रमुख राम निकम मुख्याध्यापक विकास बगाडे त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबासाहेब कुमटकर , आशा सोनवणे मॅडम, प्रियंका खोसे मॅडम ,प्रशांत कुंभार, अतूल मुंजाळ उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थी अरशिया समीर शेख, रिद्धी भिमा मोहळकर, सोनाक्षी सचिन हजारे,यांनी राम शिंदे यांचे ऑनलाईन स्वरूपात धन्यवाद व्यक्त केले. टिव्ही पॅनल दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती नान्नज मुली ,सर्व माता पालक संघ ,सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने राम शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नान्नज मुली शाळेत सभापती राम शिंदे यांच्या डिजिटल स्कूल संकल्पने अंतर्गत ऑल इन वन टच पॅनलचे ऑनलाईन स्वरूपात लोकार्पण संपन्न झाले. जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव, गटशिक्षणाधिकारी विजय शेवाळे , शिक्षण विस्ताराधिकारी जांलीदर खताळ, नान्नज केंद्रप्रमुख राम निकम, टिव्ही पॅनल दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती नान्नज मुली, संरपच, उपसंरपच, सर्व ग्रा.सदस्य, ग्रामस्थ व सर्व माता पालक संघ ,सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सभापती आ.प्रा.राम शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.