पोहेगावात महंत रमेशगिरीच्या ध्वजारोहण
सोनेवाडी ( वार्ताहर) : संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांनी अध्यात्माची पताका खांद्यावर घेत अवघ्या विश्वाला धार्मिकतेचे महत्व समजावून सांगितले. नाम सप्ताहाची परंपरा अनादी काळापासून असून योगीराज गंगागिरीजी महाराजांनी लेने को हरिनाम और देने को अन्नदान म्हणत पावणे दोनशे वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली. त्यांच्यानंतर ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज ,महंत रामगिरी महाराज यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे. ग्रंथाचे पारायण कथा प्रवचन यांनी या काळात धार्मिक वातावरण निर्माण होते. हे चांगले काम पोहेगावकरांनी हाती घेतले असून नामाचा प्रचार प्रसार व जयघोष केल्याने चांगले संस्कार होतात व जीवन सफल होते असे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्वस्त महंत रमेशगिरी महाराज यांनी केले.ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह मंडळाच्या ध्वजारोहणाप्रसंगी बोलत होते.योगीराज गंगागिरीजी महाराज व ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भजनी मंडळ ग्रामस्थ व सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह मंडळाच्या वतीने काही वर्ष खंड पडलेला हा अखंड हरिनाम सप्ताह पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सप्ताहाचे हे दुसरे वर्ष असून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या सप्ताहामध्ये आपली कीर्तन सेवा देत आहेत. सप्ताह काळात उद्या शनिवार दिनांक 8 जुलै रोजी रात्री साडेआठ ते साडेदहा या वेळेत प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. तर कविताताई साबळे ,ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, उमेश महाराज दशरथे, प्रकाश महाराज साठे ,जगन्नाथ महाराज पाटील, अर्जुन महाराज लाड त्यांचे वडील वेळेप्रमाणे रात्री कीर्तन होणार असून काल्याचे किर्तन शनिवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 वाजता महंत रामगिरीजी महाराज सरला बेट यांचे होणार आहे.
ध्वजारोहणाप्रसंगी महामंडलेश्वर शारदानंदगिरीजी महाराज, निवृत्तीगिरी महाराज, पोहेगाव पतसंस्थेचे संस्थापक नितीनराव औताडे,सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर, सचिन महारज औताडे, रमेश गुरु, अशोक नवले, विनायक मुजगुले, गोरक्षनाथ औताडे, मधुकर औताडे, प्रकाश रोहमारे, चांगदेव शिंदे, प्रकाश औताडे, पांडुरंग सरोदे, साहेबराव गोरे, चांगदेव कांदळकर, साहेबराव भालेराव, सुखदेव खंडीझोड, विनोद लोखंडे, राजेंद्र गरुड, ज्ञानेश्वर गायकवाड, चांगदेव कांदळकर, विलास जाधव, रमेश औताडे, कैलास जाधव, नवनाथ सोनवणे, साईनाथ पवार, बाळासाहेब देशमुख, चांगदेव भुजबळ, पोपटराव शिंदे, संभाजी औताडे, उत्तम शेजवळ, रविराज वाघ, मनोज औताडे, बाळासाहेब पवार, सुर्यभान गवळी, बाबुराव वाघ, बाळासाहेब जाधव, रमेश औताडे, दत्तात्रय औताडे, बाळासाहेब औताडे, अशोक औताडे, तुकाराम जाधव, संपत जोर्वेकर, रमेश झांबरे, रविंद्र औताडे, दिनकर औताडे, गणेश झांबरे, मनोहर हाडके, संभाजी सोनवणे, छबुराव वाघ, रमेश औताडे, सुर्यभान औताडे, सीताराम काकड, गजानन वाघ, शंकर वाघ, ज्ञानेश्वर बोरकर, ज्ञानदेव डमाळे, अर्जुनराव पवार, गंगाधर औताडे, रावसाहेब औताडे, संदिप देवडे, सुदाम मोरे, संदिप सुरासे, मयुर वाके, सतिश आनप, प्रथमेश औताडे, सतिश ब्राम्हणे, अमित शिंदे, गणेश गुंजाळ, सिद्धार्थ वाघ, लखन घेर, दिलीप भालेराव, साईनाथ पवार, रामदास शेजवळ, गोविंद गायकवाड, निवृत्ती जोंधळे, आदींसह ग्रामस्थ व भजनी मंडळी मोठे संख्येने उपस्थित होते.अदी उपस्थित होते.यावेळी नितीनराव औताडे यांनी सांगितले की वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले असून भगवंताची उपासना व आराधना करण्याचा महोत्सव म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताह होय. या सप्ताह काळात सात दिवस सचिन महाराज पवार पुणे हे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करून त्याचे निरूपण करणार आहेत.सप्हाची सुरुवात निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने होणार असून काल्याचे किर्तन रामगिरीमहाराज यांचे होणार आहे या कार्यक्रमाचा कीर्तन सोहळ्याचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे सांगत नितिनराव औताडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.