देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : धका धुकीच्या जिवनात आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.दैनंदिन जिवन पार पाडीत असताना दररोज नियमित योगा केला तर आनंददायी जिवन जगता येते.नियमित योगा करणारे व्यक्ती आजारा पासुन दुर राहतात.असे योग गुरु किशोर थोरात यांनी सांगितले.
देवळाली प्रवरा येथिल पी.एम.श्री.जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सेमी इंग्रजी शाळेत योग दिना निमित्त योग गुरु किशोर थोरात यांनी योगाचे प्रशिक्षण आयोजित केले होते.शालेय विद्यार्थी व शिक्षक यांनी योगासनाचे धडे गिरविले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे ,राजेंद्र बोचकर,माजी अध्यक्ष सुनिल शेटे,अमोल भांगरे, नानासाहेब होले,हसन शेख, स्वाती पालवे, मिनाषी तुपे,शिवाजी जाधव,भारती पेरणे,सुप्रिया आंबेकर,अर्जुन तुपे,वनिता तनपुरे,लक्ष्मी ऐटाळे,जकिया इनामदार,सुभाष अंगारखे आदी उपस्थित होते.
योग गुरु थोरात विविध प्रकारचे योगासने प्रात्यक्षिके करुन दाखवले. थोरात यांच्या पाठोपाठ विद्यार्थी व शिक्षकांनी योगासनाचे धडे गिरविले. योगासना नंतर विद्यार्थ्यांच्या योगासने केल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
योग गुरु थोरात यांनी यावेळी सांगितले की,धका धुकीच्या जिवनात आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. दैनंदिन जिवन पार पाडीत असताना पैसा जितका महत्वाचा आहे. तितकाच महत्वाचा योगा महत्वाचा आहे. दररोज नियमित योगा केला तर आनंददायी जिवन जगता येते.नियमित योगा करणारे व्यक्ती आजारा पासुन दुर राहतात त्यामुळे योगा करणे अत्यंत गरजेचे आहे.असे थोरात यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुञसंचालन भारती पेरणे यांनी केले.