नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या बुद्ध धर्म ग्रंथ हा बौद्ध वासियांच्या जीवनात चांगली शिकवण देऊन जीवनशैली बदलून टाकेल असा आहे. तो केवळ वाचून, ऐकून न थांबता त्यामध्ये दिलेली शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणावी. असे आवाहन धम्म प्रसारक बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे यांनी केले.
सावेडी उपनगरातील निर्मलनगर येथील सेवा निवृत्त विक्रीकर अधिकारी एम.बी.साळवे यांचे निवासस्थानी बौद्ध संस्कार संघ आयोजित वर्षावास बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे प्रबोधन पर्व संपन्न झाले. यावेळी प्रथम बुद्धवंदना करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रंथाचे वाचन एम.बी. साळवे, प्रा.डॉ.नितीन साळवे, प्रा.बी.आर.सातपुते, प्रतिभाताई देठे यांनी खंड 1 चे ग्रंथवाचन केले. भाऊसाहेब देठे यांनी विश्लेषण केले.
यावेळी डॉ.सुभम साळवे, संघर्ष पाचारणे, सुजाता भांबळ, उषा भिंगारदिवे, पी.के.भिंगारदिवे, बाळासाहेब भांबळ, बाजीराव गायकवाड, सुशिल साळवे, दिलीप साळवे, उषा साळवे, जाईबाई गायकवाड, ज्योती गायकवाड, रोहिणी साळवे, किशोरी साळवे, बाजीराव गायकवाड, बेला गायकवाड तसेच बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ग्रंथ वाचन विश्लेषणात देठे यांनी धम्माची शिकवण, जीवनशैलीबाबत माहिती देऊन या ग्रंथाची 1970 मध्ये मराठीत आवृत्ती निघाली. डॉ.बाबासाहेबांनी या ग्रंथाची प्रस्तावना लिहली. बौद्ध अनुयायांनी या धर्म ग्रंथाची शिकवण प्रत्यक्षात आचारणात आणावी, असे सांगितले.
सेवानिवृत्त विक्रिकर अधिकारी एम.बी.साळवे म्हणाले, बौद्ध संस्कार संघातर्फे नगर शहर व उपनगरात आषाढी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या चार महिन्याच्या कालावधीत बौद्ध उपासक धर्मावास बुद्ध – धर्मग्रंथ प्रबोधन पर्वाचे आयोजन करतात. आज आमच्या परिवारातर्फे हा कार्यक्रम उत्साहात पार पडल्याने मनाला समाधान मिळाले असे त्यांनी सांगितले.
या वर्षावास पर्वानंतर उपस्थित उपासकांना साळवे परिवाराने भोजन दिले. सर्वांनी त्यांचे आभार मानले.