निळवंडे व गोदावरीच्या पाण्याची पूर्व बाजूनेही होणार गळाभेट

0

विधानसभाला आ. आशुतोष काळेंना जास्तीत जास्त मताधिक्य देवून उतराई होणार – औताडे

कोळपेवाडी वार्ताहर :- स्वप्ने तर सर्वच दाखवतात परंतु हे स्वप्न सत्यात उतरविणारे हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच असतात. यामध्ये आ. आशुतोष काळे अग्रभागी असून निळवंडेच्या पाण्याची पोहेगाव शिवारातून पूर्व बाजूनेही गोदावरीच्या पाण्याची गळाभेट होणार आहे. यावरून आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून निळवंडेचे पाण्याने किती भाग व्यापला याची प्रचीती येत असून या पाण्याने आलेली समृद्धी आम्ही  कधीच विसरणार नाही व मागील विधानसभा निवडणुकीची आ.आशुतोष काळे यांना मताधिक्य देण्याची परंपरा या विधानसभा निवडणुकीत कायम ठेवून जास्तीत जास्त मताधिक्य देणार असल्याचे पोहेगावचे मा.ग्रा.सदस्य नंदकिशोर औताडे यांनी म्हटले आहे.

This image has an empty alt attribute; its file name is kolhe-1.jpg

औताडे यांनी पुढे असे म्हटले आहे की,आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती भागातील रांजणगाव देशमुख, वेस, सोयगाव,अंजनापुर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद, मनेगाव,काकडी, मल्हारवाडी, अंजनापूर तसेच मतदार संघातील राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावातील नागरिकांना नेहमीच पाणी टंचाईच्या मोठ्या झळा सोसल्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर तर ठरलेले मात्र मागील काही वर्षात आ.आशुतोष काळे यांनी हि परिस्थिती बदलविली आहे. ज्या निळवंडेचे पाणी या जिरायती गावातील नागरीकांना दिवास्वप्न होते ते स्वप्न आ.आशुतोष काळे यांनी सत्यात उतरवून हे पाणी पूर्ण जिरायती गावात नेले आहे. या निळवंडेच्या पाण्यातून डांगेवाडी, मनेगाव, सोयेगाव, वेस, चे मोठे बंधारे भरले बहादराबाद, शहापूरचे सर्व बंधारे भरून हे पाणी पोहेगावच्या पाटील मळ्यात पोहोचले असून पोहेगाव येथील बंधारे भरल्यानंतर पुढे घारी व डाऊचला सोडण्यात येवून या निळवंडेच्या पाण्याची गोदावरीच्या पाण्याशी गळाभेट होणार आहे.  

कित्येक दशकांची प्रतीक्षा आ.आशुतोष काळेंसारख्या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीमुळे संपुष्टात येवून जिरायती भाग सुजलाम सुफलाम होवून ज्या भागाला कुचेष्टेने दुष्काळी भाग म्हणून हिणवले जायचे ती ओळख सुद्धा पुसली गेली आहे. त्यामुळे या जिरायती गावाबरोबरच पोहेगावला देखीलनिळवंडेच्या पाण्याचा फायदा झाला आहे व भू-गर्भातील पाणी पातळी देखील वाढण्यास मोठी मदत होणार आहे. आ. आशुतोष काळे यांनी केलेली मदत व सहकार्य आम्ही कदापि विसरणार नाही व येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य देवून उतराई होणार असल्याचे नंदकिशोर औताडे यांनी म्हटले आहे. पोहेगाव परिसरात पाणी पोहचताच पोहेगाव परिसरातील नागरिकांनी बंधाऱ्यावर जावून या पाण्याचे जलपूजन करून आनंदोत्सव साजरा केला आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here