शिर्डी : केंद्रीय निवडणूक निरीक्षक कविथा रामू (भा.प्र.से) यांनी शिर्डी व कोपरगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांना भेटी दिल्या. यावेळी सुरू असलेल्या उमेदवार अर्ज छाननी प्रक्रियेचे अवलोकन केले. यावेळी नामांकन अर्ज छाननी प्रक्रियेसाठी उपस्थित उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींशी श्रीमती रामू यांनी संवाद साधला. निवडणूक प्रक्रियेबाबतच्या उमेदवारांच्या शंकांचे त्यांनी निरसन केले .
राहाता तहसील कार्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेची त्यांनी पाहणी केली. कोपरगाव येथील भेटीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत सावंत, नगरपालिका मुख्याधिकारी सुहास जगताप उपस्थित होते. राहाता येथील भेटी प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे उपस्थित होते.
यावेळी श्रीमती रामू यांनी असलेल्या उमेदवारांची अर्ज छाननी प्रक्रियेचे अवलोकन केले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात २० उमेदवारांचे ३० नामनिर्देशन पत्र दाखल होती. छाननी प्रक्रियेत १९ उमेदवारांचे २९ अर्ज वैध ठरले आहेत. वैध नामनिर्देशन असलेल्या एकूण १९ उमेदवारांची यादी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीमती सोळंके यांनी यावेळी दिली.