कोळपेवाडी वार्ताहर :- नवीन न्यायालयाच्या इमारतीचे काम सुरु असल्यामुळे तीन मजली न्यायालयात सर्वच न्यायालयांचे काम सुरु आहे. त्यामुळे या न्यायालयाच्या इमारतीमध्ये लिप्ट बसवावी या प्रमुख मागणीसह बार असोसिएशनचे सर्व प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आहेत. यामध्ये बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड.अशोकराव वहाडणे, उपाध्यक्षपदी अॅड. रमेश गव्हाणे, महिला उपाध्यक्षपदी अॅड. स्वाती मैले, सचिवपदी अॅड. राहुल चव्हाण,सहसचिवपदी अॅड.प्रताप निंबाळकर व खजिनदारपदी अॅड. दीपक पवार या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आ.आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बार असोसिएशनच्या सदस्यांनी आपल्या अडचणी आ. आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्या. त्या अडचणी समजावून घेत आ.आशुतोष काळे यांनी बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागेवर ३८.६३ कोटी निधीतून नवीन सुसज्ज न्यायालयाच्या इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात बांधलेल्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये सध्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, सिनिअर डिव्हिजन, ज्यू.डिव्हिजन आदी विभागाच्या न्यायालयांचे काम सुरु असून तिसऱ्या मजल्यावर न्यायालयीन कामकाजासाठी जिना चढून जातांना ज्येष्ठ वकील बांधवांना होत असलेल्या त्रासाची मी कल्पना करू शकतो. त्यामुळे या न्यायालयाच्या इमारतीसाठी लिप्ट बसविण्याची बार असोसिएशनची मागणी योग्य असून त्याबाबत निश्चीतपणे पाठपुरावा करून हि अडचण लवकरात लवकर दूर करू. तसेच बार असोसिएशनच्या सर्व वकील बांधवांना येणाऱ्या इतरही अडचणी सोडवू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
नवीन न्यायालयाच्या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असून या नवीन इमारतीमध्ये जास्तीत जास्त सुविधा वकिलांसाठी व पक्षकारांसाठी दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.अशोकराव वहाडणे,उपाध्यक्ष अॅड. रमेश गव्हाणे, महिला उपाध्यक्ष अॅड.स्वाती मैले,सचिव अॅड.राहुल चव्हाण, सहसचिव अॅड.प्रताप निंबाळकर व खजिनदार अॅड. दीपक पवार यांचेसह बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या दरवर्षी निवडी होतात. त्या त्यावेळी विविध समाज माध्यमातून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन देखील केले जाते. परंतु बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर न्यायालयाच्या बार रुममध्ये येवून पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणारे आ.आशुतोष काळे पहिले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी अतिशय चांगली प्रथा पाडली असून कोपरगाव बार असोसिएशनला काम करण्यासाठी निश्चितपणे प्रेरणा मिळणार आहे. अॅड.शिरीष लोहोकणे (मा.अध्यक्ष बार असोसिएशन)