न सांगता घरातून बाहेर गेल्याने मेव्हणीला काठीने मारहाण

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  

         मेव्हणी न सांगता घरातून बाहेर गेल्याने तीच्या दाजीने तीला शिवीगाळ करुन काठीने मारहाण करत मला न विचारता कोठे गेली तर तूला सोडणार नाही, धमकी दिली. ही घटना राहुरी तालूक्यातील राहुरी फॅक्टरी येथे दिनांक ३१ डिसेंबर रोजी घडलीय. 

         रेणुका विकास शिंदे, वय २५ वर्षे, राहणार राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी. ही तरूणी आई वडील नसल्याने तीच्या आत्याकडे राहते. तिचा दाजी सचिन राघु शिंदे हा त्यांच्या शेजारीच राहतो. दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजे सुमारास रेणूका ही घरासमोर होती. तेव्हा तीचा दाजी आरोपी सचिन राघु शिंदे हा तेथे आला. व मला म्हणाला की, तु आज दिवसभर कुठे गेली होती. असे म्हणुन मला शिवीगाळ करु लागले तेव्हा रेणूका त्याला म्हणाली की, मी घरीच होते. असे म्हणाल्याचा राग येवुन त्याने रेणूकाला काठीने मारहाण करून ओट्यावरुन खाली लोटुन दिले. आणि म्हणाला की, परत मला विचारले शिवाय कुठे गेली तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. घटनेनंतर रेणूका हिने अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

                रेणूका विकास शिंदे हिच्या फिर्यादीवरून तीचा दाजी आरोपी सचिन राघु शिंदे, रा. राहुरी फॅक्टरी, ता राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं  ९/२०२३ भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here