पत्रकार चौक ते प्रेमदान चौक रस्त्यावरील खड्डे बुजवून अतिक्रमणे काढावीत अन्यथा आंदोलन  – काका शेळके

0

शिवसेनेचे जागतिक बँक प्रकल्प विभागास निवेदन

     नगर –  पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यानचे धोकादायक खड्डे बुजवून अतिक्रमण काढण्यात यावीत, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने सावेडी विभागप्रमुख काका शेळके यांच्या नेतृत्वाखाली जागतिक बँक प्रकल्प विभागाला देण्यात आले. याप्रसंगी अनिकेत कराळे, प्रा.विशाल शितोळे, मयुर गायकवाड, रविंद्र राऊत, तुषार यादव, संग्राम शेळके, आबा उपाध्ये, अमोल बगाडे, अनिकेत ओझा आदि उपस्थित होते.

     निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरातील अत्यंत रहदारीचा पत्रकार चौक ते प्रेमदान चौक रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुक करणार्‍या नागरिकांना त्रास होत असून, अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. सदर खड्डयांमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. त्यातच भर म्हणून या रस्त्यावर अनेक छोट-मोठे अतिक्रमणे झालेली आहेत. त्यामुळे रस्त्याच्या लगत गाडी पार्क करणे जिकरीचे झाले आहे.

     शहरातील महत्वाच्या अशा या रस्त्याचा श्वास गुदमरला आहे. अशा बिगट परिस्थित या रस्त्यावरुन रहदारी करणार्‍या वाहनांचे अपघात होत आहेत. अशीच स्थिती कायम राहिल्यावर अपघातांचे प्रमाणात वाढ होई. सदर सर्व बाबींचा आपण गांभिर्याने विचार करावा व पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यानचे अतिक्रमण हटवून रस्त्यातील खड्डे तातडीने बुजवावे, जेणे करुन लोकांचे प्राण वाचतील.

     जर 15 दिवसात ही कारवाई झाली नाही तर आम्ही शिवसेनेच्यावतीने या रस्त्यावर रस्ता-रोको करु, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here