पत्रकार बंडू पवार यांच्या ’अस्वस्थ मनाच्या व्यथा’ या कथासंग्रहाचे शनिवार प्रकाशन

0

चित्रपट निर्माते दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर, जेष्ठ पत्रकार अंशुमन तिवारी, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार प्रकाशन सोहळा

     नगर – पत्रकार बंडू पवार यांच्या ’अस्वस्थ मनाच्या व्यथा’या कथासंग्रहाचे शनिवार (1 जुलै) ला सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत कोहिनूर मंगल कार्यालय (पारिजात चौक) येथे प्रकाशन होणार आहे.

     कोरोना कालावधीत जगलेल्या सर्वसामान्य माणसांचा प्रवास या अस्वस्थ मनाच्या व्यथा’ या कथासंग्रहातून बंडू पवार यांनी मांडला आहे. या कथासंग्रह प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार आहेत.  सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर, वरिष्ठ पत्रकार अंशुमन तिवारी, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार लहू कानडे यांच्या हस्ते या कथासंग्रहाचे प्रकाशन होणार असून, या प्रकाशन सोहळ्यासाठी सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, प्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे उपस्थित राहणार आहेत. या कथासंग्रहाचे प्रकाशन वल्लरी प्रकाशन (पुणे ) यांनी केले आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here