पत्रकार राजेंद्र उंडे यांना राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार!

0

२१ सप्टेंबर रोजी मलकापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा

राहुरी /प्रतिनिधी :

        राहुरी तालुक्यातील जेष्ठ पत्रकार,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद चे जिल्हा सदस्य व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक व दै.लोकप्रभातचे प्रतिनिधी राजेंद्र गंगाधर उंडे सर यांना बुलढणा जिल्ह्यातील मालकापूर येथील माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. 

   माणूसकी फाउंडेशन चे अध्यक्ष विवेक राजपुरे यांनी या पुरस्काराची घोषणा केली असून या पुरस्काराचे वितरण शनिवार दि. २१सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मलकापूर येथे होणार आहे.

पत्रकार राजेंद्र उंडे यांना यापूर्वी ही अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यात प्रमुख्याने ,शिवशंभो ट्रस्ट च्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार2006, अंकुर साहित्य संघ च्यावतीने शोध पत्रकारिता पुरस्कार 2007,ओबीसी एनटी च्यावतीने महाराष्ट्र भूषण पत्रकारिता पुरस्कार 2010, संत सवाता युवा संघ च्या वतीने सावता भूषण पत्रकारिता पुरस्कार वर्ष 2011, क्रीड़ा फाउंडेशनचे वतीने श्री संत भूमिकला, श्री संत भगवान बाबा पत्रकारिता पुरस्कार 2014 ,हरिहरेश्वर ग्राम विकास फाउंडेशन च्या वतीने  ग्रामीण समाज भूषण पत्रकारिता पुरस्कार वर्ष 2015,छत्रपति प्रतिष्ठान, उंबरे च्या वतीने    छत्रपति पुरस्कार 2016, पत्रकार उत्कर्ष समिति, पनवेल च्या वतीने राज्य स्तरीय शोध पत्रकारिता पुरस्कार 2018, कॉ .जनार्दन माधव पानपाटिल सामाजिक बहुउद्देशीय संस्था चे वतीने भारत रत्न डॉ. बाबासाहेब अम्बेडकर राज्य स्तरीय पत्रकारिता पुरस्कार 2018 असे अनेक पुरस्काराचा सामावेश आहे.

       पत्रकार राजेंद्र उंडे यांना मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here