*पदवीधरांची सत्व परिक्षा*

0

*पदवी घेऊन साक्षर झाले की सुशिक्षीत*

   नाशिक मतदार संघात पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली.. सरंजामांनी कंबर कसली.. प्रत्येक गावात मतदार नोंदणीचे केंद्र उभारले गेले.. पदवीधरांचे उंबरे झिजले मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी..

आता मतदार प्रतिक्षेत होते एका चांगल्या उमेदवाराच्या.. मग सरंजामांच्या तमाशाचा कलगीतूरा पुन्हा महाराष्ट्राने अनुभवला.. आणि आता खरच पदवीधरांची सत्व परिक्षा सुरू झाली.

सार्वत्रिक निवडणूकीत मतदार  आडाणी असतो, पिचलेला असतो, गरिब असतो, शिक्षणा पासून वंचित असल्यामुळे पाचशे व एका चपटीत सोने व पितळातील फरक त्याला करता येत नाही.. भपक्यानेच त्याचे दोळे दिपतात..

*पदवीधर म्हणजे शिकलेला, ज्ञानार्जन केलेला व ज्ञान देणारा.. चांगले व वाईट ची जाण असलेला पदवीधर.. इतिहास वाचलेला व इतिहास घडविणारा पदवीधर.. सरंजामशाही ने देशाला दिलेल्या चटक्यांची जाण आहे पदवीधरांना..*

दलबदलू व निती शून्य संस्कार समाजात रूजवणाऱ्यांची चिड असवीच पदवीधरांना.. देशातील भ्रष्टाचार व आचार शून्य राजकारणाला वळण दऊ शकतो केवळ पदवीधर..

मी कुठल्या पक्षाचा व्यक्तिचा समर्थक नाही पण मला चिड आहे निती मुल्य न जपणाऱ्या सरंजामांची.. माझ्या देशाच्या युवकांनी, तरूणांनी यांचे कडून काय आदर्श घ्यावा व देशाच्या राज्याच्या विकासाची काय अपेक्षा धरावी यांचेकडून.. यांचे समाजा प्रती कर्तुत्व काय.

आता पदवीधर मतदारावर मोठी जबाबदारी आहे.. लोकशाहीने गलिच्छ सरंजामशाही नाकारण्याची.. निती शून्य व निती मुल्य नसलेले तडीपार करण्याची..

जर पदवीधरांनीच सरंजामशाही व नितीमुल्य नसलेल्या उमेदवारांना पसंती दिली तर विद्यापीठ पदवीधरांना फक्त साक्षर करतात हे सिध्द होईल..

*खरच ही निवडणूक म्हणजे पदवीधरांची सत्व परिक्षा*

*संजय भास्करराव काळे*

ReplyForward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here