परभणी संविधान विटंबना;राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कोपरगाव येथे निवेदन देऊन निषेध

0

 पोहेगांव प्रतिनिधी : परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वतीने सोमवारी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले त्याचाच भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीपराव कानडे यांचे नेतृत्वाखाली तहसीलदार महेश सावंत  यांना आज निवेदन देण्यात आले

       

ही घटना घडल्याने देशभरातील चर्मकार समाज दुखावला असुन विकृत मानसिकता असणाऱ्या अशा आरोपींना कडक शासन व्हावे या निंदनीय घटनेच्या मागे असणाऱ्या शक्तींचा खऱ्या सुत्रधाराचा शोध लावावा अशी मागणी करत सदरच्या घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वतीने तिव्र शब्दांत निषेध करत निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपराव कानडे म्हणाले की चर्मकार समाज हा शांतता प्रिय समाज आहे मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहे तर संविधान आमच्यासाठी पुज्यनिय असुन संविधानाच्या बाबतीत अशा घटना पुन्हा घडु नयेत यासाठी सदर घटनेतील मुख्यसुत्रधाराचा शासनाने शोध घ्यावा व आरोपींवर कार्यवाही करावी तसेच उत्तर अ.नगर जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे यावेळी बोलताना म्हणाले की 

या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन आमच्या भावना लक्षात घेऊन या घटनेतील मुख्य सुत्रधार आरोपींना त्वरीत अटक करून कार्यवाही करावी अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आदरणीय बबनरावजी घोलपनाना यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी .

 या प्रसंगी तहसिलदार महेश सावंत यांनी निवेदन स्वीकारून शासनाला अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते ,नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, बाळासाहेब फरताळे आदी उपस्थित होते

       

निवेदनावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीपराव कानडे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे, उत्तर विभागाचे युवा अध्यक्ष तुषार पोटे, राज्य कार्यकारणी सदस्य एम डी कानडे, उपजिल्हा अध्यक्ष देविदास कानडे,युवा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ दुशिंग, तालुका अध्यक्ष माधवराव पोटेसर,शहराध्यक्ष गणेश कानडे, जिल्हा सचिव संजय पोटे,जिल्हा कार्याध्यक्ष संजय सरवार, तालुका कार्याध्यक्ष अँड रमेश दुशिंग, युवा तालुका अध्यक्ष संतोष शिंदे, संतोष कानडे ,संतोष दळवी,सागर पोटे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत याप्रसंगी सर्व पदाधिकारी यांचेसह मारुतीराव सरवारसर  राकेश धाकतोडे,जगन्नाथ कानडे,संदेश कानडे,उमेश बारसे,संकेत कानडे, मोहित पोटे,विशाल अभंग आदी समाज बांधव यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here