पर्यावरण रक्षणासाठी डॉ सुनील फुलसावंगे यांचा अहमदनगर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

0

राहुरी : राहुरी कृषी विद्यापीठातील प्राध्यापक आणि एनसीसी अधिकारी डॉ सुनील फुलसावंगे यांनी अहमदनगर ते कन्याकुमारी असा केला दहा दिवसात पूर्ण केला .
15 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी एक वाजता अहमदनगर येथून सुनील यांनी आपल्या सायकल प्रवासाला सुरुवात केली आणि सलग दहा दिवस सायकल चालवून ते भारताच्या दक्षिनेच्य शेवटच्या टोकाला कन्याकुमारीला पोहोचले. सध्या पर्यावरणाचा समतोल आणि पर्यावरण पूरक जीवनशैली अवलंबण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने डॉ. सुनील यांनी आरोग्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी हा सायकल 1500 प्रवास केलेला आहे.
मागील पाच वर्षापासून सायकलवर विविध ठिकाणी प्रवास करणारे डॉ सुनील फुलसावंगे हे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आणि राष्ट्रीय क्षेत्र सेना अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी एका दिवसामध्ये अहमदनगर ते शेगाव ३४० किलोमीटर पूर्ण केले होते. तसेच पंढरपूरचे सुद्धा 220 किलोमीटर त्यांनी एका दिवसात सायकलवर पूर्ण केली होती आणि तीन दिवसांमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात मध्ये त्यांनी सायकलवर स्वारी केलेली आहे.
अशा प्रकारच्या राईड केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीनच वाढला आणि अहमदनगर ते कन्याकुमारी हे पंधराशे पस्तीस किलोमीटर अंतर त्यांनी सतत साडेनऊ दिवस दिवसात सायकलवर पूर्ण केले.
विशेष बाब म्हणजे यामध्ये त्यांनी कोणाचेही बॅकअप घेतलेला नव्हता तसेच. 16 किलो ची सायकल, सात किलो ची बॅग आणि सायकलला हवा मारण्याचा पंप इत्यादी साहित्य असे जवळपास 22 किलो वजन घेऊन त्यांनी ही फेरी पूर्ण केलेली आहे. 15 ऑगस्ट ला मानवंदन करून डॉ. सुनील दुपारी एक वाजता अहमदनगर वरून कन्याकुमारी ला जाण्यासाठि निघाले. या या प्रवासादरम्यान करमाळा विजापूर इलकल कुडलिंगी शिरा करूर बेंगलोर चतुर चतुर सत्तुर आणि कन्याकुमारी या ठिकाणी मुक्काम केलेला होता.

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ . सुनील म्हणाले की या प्रवासादरम्यान अशी बरीच माणसे भेटली ज्यांनी आमच्याविषयी चौकशी केली आणि कौतुक केली. काही लोकांना आम्हाला राहण्यासाठी जागा दिल्या, काही जणांनी पाण्याच्या बॉटल्स आणि रिफ्रेशमेंट साठी लागणाऱ्या वस्तू दिल्या आणि तुमचा प्रवास सुखकर होवो यांच्या शुभेच्छा देण्यात आल्या अशा गोष्टीमुळे माझा विश्वास आणखीनच वाढत गेला.
खरे सांगायचं झालं तर सायकलचा प्रवास हा तर हा प्रवास नसतो तर तो एक निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्वणी असते . आणि खरा निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर कार मध्ये बसून किंवा बस मध्ये बसून तो तुम्हाला घेता येणार नाही. ज्यावेळेस तुम्ही सायकलवरून प्रवास करतात त्यावेळेस रस्त्यातला लावलेला छोटासा दगड किलोमीटरचा हे सुद्धा तुमच्या लक्षात येतो आणि लक्षात राहतो. निसर्ग एवढा अफाट आहे तुम्ही जेवढे त्याचे निरीक्षण करत जा तेवढे ते निरीक्षण कमी पडते तर या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे की कर्नाटक आणि तमिळनाडू की जी राज्य आहेत ही निसर्गाने भरपूर उधळण या ठिकाणी केलेली आहे. याची जाणीव आम्हाला क्षणोक्षणी होत होती. मोठमोठी डोंगर, नारळाची झाडे, ढगाची छटा, पक्ष्यांचे आवाज, डोंगर, दर्या, पाणी, हवा या प्रवासामध्ये डोळेभरून बघितल्या.
खरंतर हा प्रवास यशस्वी होण्यासाठी बऱ्याच व्यक्तींचा हातभार लागलेला आहे. या प्रवासादसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांतकुमार पाटील ,डॉ सुनील गोरंटीवार, संशोधन संचालक आणि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ श्रीमंत रणपिसे व कुलसचिव डॉ विठ्ठल शिर्के यांचे सहकार्य व मा्गदर्शन लाभले.
सगळ्यात महत्त्वाचे आमचे सहयोगी अधिष्ठाता डॉ डी. डी. पवार आणि माझे विभाग प्रमुख डॉ. विरेंद्र बाराई यांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन लाभलेले आहेत.
वेळोवेळी प्रवासादरम्यान माझी विचारपूस करणारे माझी काळजी घेणारे राहुरी सायकल ग्रुपचे मेंबर्स अध्यक्ष अरुण टाकते, गोरख मैहत्रे , पोपळघट माऊली, नालकर साहेब, सुनील शिंदे, राऊत साहेब, कडुबा इंगळे, नितीन शहाणे,बाच्कर साहेब ,विलास तरवडे, आणि इतर सर्व मेंबर यांनी मला प्रवासादरम्यान भरपूर मदत केलेली आहे. तसेच माझे मित्र व NCC अधिकारी डॉ. अंकुश आवारे हे सुद्धा माझ्यासोबत सायकल वर बेंगलोर पर्यंत साथ दिली आणि मला मदत केली
ज्यांच्या मदतीशिवाय मी राईट पूर्ण करू शकत नाही अशी माझी पत्नी जयश्री आणि माझ्या कन्या गौरी आणि स्वरा यांचे सुद्धा मदत झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here