पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत सिमा जावळेने सोनेवाडीचे नाव उज्वल केले : तहसीलदार बोरुडे

0

कोपरगाव… शेतकरी कुटुंब, पुरेषा सुविधा उपलब्ध नसतानाही तसेच मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेऊन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न अंगी बाळगून सीमा जावळे यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली. तिने मिळवलेल्या यशामुळे सोनेवाडी गावचे व कुटुंबाचे नाव उज्वल झाले असे प्रतिपादन कोपरगाव चे तहसीलदार विजय बोरुडे यांनी केले.

ते काल ब्राह्मणंगाव येथे कुमारी सिमा जावळे हिचा सन्मान करताना बोलत होते.

यावेळी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी विकास घोलप, प्रकाशराव जाधव, विजय नायडू, येवल्याचे कृषी अधिकारी साईनाथ कालेकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे संदीप काकड, मंगेश जपे, कैलास माकोणे, मंडळ अधिकारी सुनील घारकर, आबासाहेब जावळे आदी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कोपरगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोसावी यांनी देखील सीमा जावळे यांच्या यशाबद्दल तिला शुभेच्छा देत असताना तिच्या कुटुंबाचे व तिच्या आई-वडिलांचे विशेष कौतुक केले. जिद्द आणि चिकाटी ठेवल्यास यश निश्चित मिळते असे त्यांनी सांगितले. तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या सत्कारामुळे जावळे भाराहुन गेल्या होत्या. सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की माझ्या यशामध्ये सर्वप्रथम कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. एक मुलगी म्हणून त्यांनी मला शिक्षणासाठी त्यांच्यापासून जवळपास चार वर्ष बाहेर ठेवले. त्यांच्यासह माझ्या शिक्षकांनाही मला यात विशेष मार्गदर्शन केले. मिळालेल्या या पदाचा मी शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी माझ्या पदाचा निश्चित उपयोग करेल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कैलास माकोणे यांनी मांनले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here