पाच वर्षीय चिमुरडी चायना मांजाने गळा कापून गंभीर जखमी

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी, 

     राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे स्वरा चाकणे ही पाच वर्षीय मुलगी तीच्या वडिलां सोबत मोटरसायकलवर जात असताना तीचा चायना मांजाने गळा कापून ती गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना दिनांक १० जानेवारी रोजी घडली.

           गोविंद वसंत चाकने हे राहुरी तालूक्यातील वांबोरी येथील रहिवाशी आहेत. त्यांची पाच वर्षीय मुलगी स्वरा गोविंद चाकने ही मुलगी राहुरी शहरातील त्यांचे नातेवाईक संजय गुलदगड यांच्याकडे आली होती. दिनांक १० जानेवारी रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान स्वरा व तीचे वडील मोटरसायकलवर वांबोरी येथे जात होते. दरम्यान राहुरी खुर्द येथेच माऊलाई मंदिरा समोर रस्त्याने जात असताना चायना मांजा स्वरा हिच्या गळ्याला अडकून कापला गेला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. तीच्यावर अहमदनगर येथील खिजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तीच्यावर आज दिनांक ११ जानेवारी रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आली.

          येत्या १५ जानेवारीला मकरसंक्रांत हा उत्सव असून तालूक्यासह शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग व चायना मांजाच्या दूकाना लागल्या आहेत. चायना मांजावर प्रशासनाकडून बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणावर चायना मांजाची अनाधिकृतपणे विक्री आहे. चायना मांजाने अपघात होऊन अनेकजण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिस व महसूल प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे चायना मांजाची दुकाने वाढली असून मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याचे चिन्ह दिसत आहेत. महसूल व पोलिस प्रशासनाने तालूक्यात व शहरात विक्री होत असलेल्या चायना मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here