पैठण,दिं.३१: पैठण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता भालचंद्र दाणेकर हे आपली शासकीय सेवा ३३ वर्ष पूर्ण करुन नियत वयोमानानुसार शुक्रवार दिं.३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी सह सोमपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने दानेकर यांना सेवानिवृत्ती बदल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गंगाधर निसरगंध म्हणाले की, शाखा अभियंता दानेकर यांनी पैठण तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणीपुरवठा सह जलजीवन मिशन अंतर्गत चांगले कामे केली यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, पैठण पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अशोक घुगे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गंगाधर निसरगंध,सरपंच जावेद पठाण, ग्रामविकास अधिकारी योगेश कांबळे, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष खंडू वीर, ग्रामसेवक पतसंस्थेचे सचिव सागर डोईफोडे ,दिपक साळवे,शाम इंगोले, ग्रामविकास अधिकारी नारायण पाडळे, बाळकृष्ण गव्हाणे, कैलास गायकवाड, बबन हलगडे, छत्रपती राठोड,दिपक साळवे,उमर शेख, मनिष पाटील, अमोल भागवत,नय्युम बेग, शिवाजी जानकर, महेंद्र गायकवाड सह आदी उपस्थित होते.