लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळा अनावरणासाठी कोपरगावात भीक मांगो आंदोलन
कोपरगाव : थातूर मातुर विकासकामांच्या उद्घाटनासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री कोपरगाव मध्ये येतात. मात्र साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. याचा अर्थ काय ? Annabhau Sathe लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या नावाचे त्यांना वावडे आहे काय ? असा सवाल जितेंद्र रणशूर Jitendra Ranshur यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील Radhakrushana Vikhe यांना केला आहे. तसेच पुतळा अनावरण सोहळ्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पाठपुरवठा का केला नाही असा सवाल पालिका प्रशासनास केला आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण दीड वर्षांपासून प्रलंबित आहे . याकरिता सत्यशोधक लहूजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख फकीरा चंदनशिव यांच्या नेतृत्वाखाली आज भीक मांगो आंदोलन करण्यात आले . याप्रसंगी रणशूर बोलत होते
अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गेल्या दीड वर्षा पासून का प्रलंबित आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी आज सर्व समाजबांधव नागरिक मोठ्या संख्येने भीक मांगो आंदोलन करीत नगर पालिका मुख्याधिकारी यांच्या दालनात जमा झाले होते. त्यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सांगितले की आम्ही २९ सप्टेंबर रोजीच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी वेळ मागितला आहे . त्यांच्याकडून कामाच्या व्यस्ततेमुळे अद्याप वेळ मिळालेला नाही . त्यांचा वेळ मिळविण्यासाठी पुन्हा प्रयत्न करून लवकरच अनावरण सोहळा करण्यात येईल .
वारंवार आंदोलन करूनही पालिका प्रशासनाला जाग येईना ? फकीरा चंदनशिव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय अनावरण व्हावे यासाठी मी दोनदा आंदोलन केले. प्रशासनाने दोन्ही वेळा आश्वासन देऊनही अद्यापही पुतळा अनावरण सोहळ्यास प्रशासनाला वेळ मिळत नाही . त्यामुळे नाईलाजास्तव आपणाला भिक मांगो आंदोलन करावे लागत आहे . याउपरही प्रशासनला जाग न आल्यास मी पालिकेच्या आवरात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करील असा इशारा चंदनशिव यांनी यावेळी दिला .
…तर पालक मंत्र्यांना कोपरगावात फिरकू देणार नाही : विजय त्रिभुवन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी कोपरगावच्या आजी माजी लोकप्रतिनिधीना याबाबत पत्र देण्यात आले आहेत , फाकीरा चंदनशिव यांनी याकरिता दोनदा उपोषणही केले. पालक मंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडविण्यात आले. त्यावेळी पालक मंत्र्यांनी पुतळा अनावरणाचा शब्द दिला होता . मात्र पालक मंत्र्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला की काय ? साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या महान व्यक्तीच्या पुतळा अनावरणास पालकमंत्री विनंती करूनही वेळ देत नसेल तर पालक मंत्र्यांना कोपरगावात आम्ही फिरकू सुद्धा देणार नाही. ज्यावेळेला फकीरा भाऊंनी आंदोलन केले त्यावेळी ते एकटे होते. मात्र आता भीम सैनिक त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी आण्णाभाऊंच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा लवकरात लवकर करावा. अन्यथा भीम सैनिकांचे आंदोलन कसे असते हे आम्ही त्यांना दाखवून देऊ असा इशारा दि बुध्दिस्ट यंग फोरमचे अध्यक्ष विजय त्रिभुवन यांनी यावेळी पालिका प्रशासनला दिला .