पालकमंत्र्यांसह दोन आमदारांनी मारला एसटीतून फेरफटका …

0

नगर प्रतिनिधी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नगर जिल्ह्यातील विविध एसटी आगारांना 45 नवीन बस मिळालेल्या आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे , आमदार शिवाजी कर्डिले आणि आमदार संग्राम जगताप यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार शिवाजी कर्डिले यांनी नवीन बसमधून फेरफटका मारला. 

अहिल्यानगर-पुणे विना वाहक बससेवेचा प्रारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तारकपूर बस स्थानक येथे करण्यात आला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना ,’ एसटी बस ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. पूर्वीच्या काळी गावात एसटी बस येणे हे मानाची गोष्ट समजली जायची. एसटी महामंडळाच्या ताब्यात अनेक आधुनिक बस आता दाखल झालेल्या असून अधिक दर्जेदार सेवा देऊन प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करून घेण्याची गरज आहे ,’ असे म्हटले आहे . 

तारकपूर आगारात आलेल्या नवीन बस फुगे आणि फुलांनी सजवण्यात आलेल्या होत्या. नवीन बस दाखल झाल्यानंतर त्या पाहण्यासाठी देखील प्रवासी आतुर झालेले होते. बसस्थानकाच्या सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here