पिकअप चोरायला गेले आणि पोलीसांच्या हाथी लागले

0

आरोपी मध्ये देवळाली प्रवराच्या तिघांचा समावेश

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

           राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथिल तिघे पारनेर तालुक्यात पिकअप चोरण्यासाठी गेले माञ गस्तवरील पोलीसांच्या अलगद हाथी लागल्याने पारनेर तालुक्यातुन  वाहने चोरून इतरत्र विकणाऱ्या टोळीस पकडण्यात सुपा पोलीसांना यश आले आहे. 

               याबाबत पोलीस सुञाकडुन समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा ता.राहुरी येथिल  इरफान हारून खान (25), मुश्पीक निजाम सय्यद (27), मुस्ताफ सय्यद (19)हे सर्व जण सुपा येथे पिकअप वाहन चोरण्यासाठी गेले होते.सुपा गावात पोलीस राञीची  गस्त घालत असताना त्यांना एका दुचाकीवर तिघेजन संशयितरीत्या फिरताना आढळून आले. पोलीसांनी त्यांना हटकले असता. तिघांनी गाडी सोडून पळ काढला. पोलीसांनी पाठलाग करून यातील इरफान खान यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता  सुपा येथे पिकअप वाहन चोरण्यासाठी  आलो  असल्याचे सांगीतले.

       याबाबत सुपा पोलीसांनी  एकृ पथक राहुरी पोलीस ठाण्यात पाठवुन दोन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी मदत घेतली. देवळाली प्रवरातील दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून एक पिकअप वाहन व एक दुचाकी जप्त करण्यात आली. ही वाहने त्यांनी गंगापुर पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्याचे सांगीतले. तसेच एक पिकअप व बोलेरो गाडी श्रीरामपूर येथील संदिप जगन साठे यास विक्री केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

          श्रीरामपूर येथील संदिप जगन साठे हा फरार झाला आहे. ही कामगिरी उपविभागीय अधिकारी अजित पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सुपाच्या पोलीस निरिक्षक ज्योती गडकरी, पोलीस कर्मचारी रमेश कानगुडे,संदिप पवार, अशोक ठोंबरे,रमेश शिंदे, कल्याण लगड ,खंडेराव शिंदे,आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here