पोहेगांव ( वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात विद्युत वितरण कंपनीकडून शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याने काल पोहेगाव येथे विद्युत वितरण कार्यालयावर सोनेवाडी येथील शेतकऱ्यांनी आपला मोर्चा नेला. विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी श्री निरगुडे यांना धारेवर धरत प्रश्नाचा भडिमार शेतकऱ्यांनी केला.
जर शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा मिळाला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचे शेतकरी निरंजन गुडघे, संजय गुडघे, शिवदास जावळे, किशोर जावळे, पोलीस पाटील दगु गुडघे, संदीप गुडघे यांनी सांगितले.
गोदावरी कालव्याला आवर्तन सुटल्यानंतर विद्युत वितरण कंपनीकडून सोनेवाडी परिसरातील रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावला आहे या धर्तीवर काल सोनेवाडी येथील शेतकऱ्यांनी पोहेगाव कार्यालयावर आपला मोर्चा काढला. यावेळी रंजन गुडघे, संजय गुडघे ,संदीप गुडघे, बाळासाहेब जावळे, किशोर जावळे, शिवाजी गुडघे,उद्य घोंगडे,
सयराम गुडघे, पोलीस पाटील दगू गुडघे, शिवाजी दहे,पु़जाभाऊ जावळे, शिवदास जावळे, विनायक जावळे,यमा जावळे,बहिरु मिंड, दिपक घोंगडे,
संतोष गुडघे आदी उपस्थित होते. यावेळी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी श्री निरगुडे यांनी सांगितले की या परिसरात ओव्हरलोड फिटर असल्याने पूर्ण दाबाने वीस पुरवठा देता येत नाही. मात्र शेतकरी शिवदास जावळे यांनी वीस वर्षापासून आम्ही हेच ऐकतो असे त्यांना सुनावले. शेतकऱ्यांच्या वतीने निरगुडे यांना निवेदन देण्यात आले. जर येत्या दोन दिवसात विद्युत पुरवठा पूर्ण दाबाने झाला नाही तर सोनेवाडी परिसरातील शेतकरी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला