पेमगिरीत ३० फूट हनुमान गदेचे गुरुवारी लोकार्पण ;

0

आ.थोरात, आ.तांबे,अभिनेता देवदत्त नागे,आ.लहामटे यांची उपस्थिती

संगमनेर  :  हनुमान जयंती दिनी गुरुवार दि. ६ एप्रिल रोजी तालुक्यातील ऐतिहासिक शहागडाच्या पायथ्याशी असलेल्या पेमगिरी येथे भारतातील सर्वात उंच मारुतीरायांच्या ३०  फूट गदेचा लोकार्पण सोहळा सायंकाळी ५ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पेमगिरीचे माजी सरपंच सोमनाथ गोडसे यांनी दिली.

           या लोकार्पण सोहळ्याला राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात,आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे,अभिनेता देवदत्त नागे, प्रा.नामदेवराव जाधव हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना सोमनाथ गोडसे म्हणाले की, पेमगिरी हे संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक गाव असून येथे शहागड व भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष आहे.याबरोबर आता नव्याने भारतातील सर्वात उंच मारुती रायांची ३० फूट गदा या ठिकाणी उभारली आहे. हनुमान जयंती निमित्त या ऐतिहासिक ३० फुटी गदेचे लोकार्पण काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, आमदार किरण लहामटे, सिने अभिनेता देवदत्त नागे, इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. नामदेवराव जाधव यांच्या उपस्थितीत आयोजित केले आहे. याप्रसंगी डॉ.प्रसाद रसाळ ,अजित पाटील, राजेंद्र जाधव व छत्रपती युवा प्रतिष्ठान कळस यांना गौरवण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, ॲड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, बाबा ओहोळ, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, राजेश मालपाणी, मिलिंद कानवडे, बाळासाहेब देशमाने , पांडुरंग घुले यांसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील व पंचक्रोशीतील नागरिक,युवक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेे आवाहन पेमगिरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here