देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
रविवारचा दिवस दाट लग्नसराई, राहुरीतील सतसंग मेळावा नगर मनमाड महामार्गावर वाहतुकीची कोंडी, महामार्गावर बेशिस्त वाहतुकीस शिस्तबद्ध करण्यासाठी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे जेव्हा काठी उगारतात तरीही वाहतुकीला शिस्त लागलीच नाही.उलट वाहतुकीची कोंडी वाढतच गेल्याने हटलीच नाही वाहतुकीची दाटी!
नगर मनमाड महामार्गावर कधी अचानक वाहतुकीची कोंडी होईल याचा नेम नाही.रविवारचा दिवस मोठ्या प्रमाणात लग्न सराई असल्याने महामार्गावर वाहनांची संख्या वाढली.त्यातच राहुरी येथे नरेंद्र महाराज यांचे दर्शन व सतसंगाचा कार्यक्रम असल्याने अनेक भाविकभक्त या ठिकाणी आपल्या वाहनातुन आलेले होते.त्यामुळे दररोजच्या पेक्षा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली होती. वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीची कोंडी झाली.तासन तास वाहुतक ठप्प झाली होती.
महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील देवळाली प्रवरा चौकात वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली दिसली.वाहतुकीची कोंडी होताच राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे आपल्या फौज फाट्यासह महामार्गावर उतरले.पोलिस निरीक्षक ठेंगे सह पोलिस कर्मचारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी काठी उगारतात परंतू किठी उगारुनही वाहतुकीची कोंडी काय सुटली नाही.वाहतुकीला शिस्त लावण्यात पोलिस अपयशी ठरतात. जागा दिसेल तेथुन वाहन घालण्याचा प्रयत्न वाहन चालक करीत असल्याने वाहनांची कोंडी होत होती.अखेर पोलिसांनी हातातील काठी खाली ठेवून बेशिस्तपणे आडवे तिडवे शिरलेली वाहने एका रांगेत आणून वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.वाहनधारकांच्या आडमुठ्या धोरणामुळे पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली.सायंकाळ पर्यंत वाहतुकीची कोंडी काय सुटली नाही. नाही.
शिर्डी व शनिशिंगनापुर येथिल भाविक व अन्य वाहानाची रेलचेल त्यात लग्न सराई मुळे वाहतुक चक्का जाम याच दरम्यान रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषदचे सभापती राम शिंदे शिर्डी येथुन नगर कडे जाणार होते. ते हेलिकॉप्टर गेल्याने स्थानिक पोलीसांनी सुटकेचाश्वास टाकला खरा! पण वाहतुकीची कोंडी डोकेदुखी ठरली
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस राज्य महामार्गवरुन प्रवास करणार असल्याने पोलीस चौकात आले. मात्र वाहतुक कोडी सरळ करण्यात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना काठी उगारावी लागली आडवी तीडवी घुसणारी वाहतुक पोलीसांनी सुता सारखी सरळ केली.