पोहेगांव ते त्र्यंबकेश्वर दिंडी सोहळ्यास विणा भेट

0

कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथून त्रिंबकेश्वर कडे जाणाऱ्या योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज पायी दिंडीला हरीनभा प्रतिष्ठानच्यावतीने भारुडसम्राट भानुदास बैरागी यांनी विणा भेट दिला. रघुनाथ महाराज देवडे व लोखंडे महाराज यांनी बैरागी यांनी दिलेला विना स्वीकारला व त्यांचे आभार व्यक्त केले.

योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज व ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने महंत रामगिरी महाराज यांचे प्रेरणेने व अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेगाव ते त्र्यंबकेश्वर हा पायी दिंडी सोहळा संपन्न करण्यात येतो.

आज सोमवार दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी ८ वा.पोहेगाव येथून या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. समस्त ग्रामस्थ पोहेगाव व भजनी मंडळाच्या वतीने या पालखी दिंडीचे नियोजन करण्यात येते. दिंडीत सामील होणाऱ्या भाविकांसाठी दररोज चहा नाष्टा व महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. या पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पोहेगाव पायी दिंडी सोहळ्याच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here